शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
4
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
5
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
6
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
7
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
8
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
9
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
10
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
11
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
12
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
13
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
14
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
15
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
16
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
17
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
18
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
19
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
20
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं

अमरावतीत दोन कोरोना लॅब, उद्या पोहोचणार यंत्रसामग्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

कोरानासंबंधी नमुने तपासण्यासाठी नागपूरला चार प्रयोगशाळा आहेत. अमरावती हे विभागीय मुख्यालय आहे; मात्र येथे एकही प्रयोगशाळा नाही. दोन प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात, यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी दिला निधी विद्यापीठ, पीडीएमसीत होणार चाचण्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती शहरात लवकरच दोन कोराना लेबॉरेटरीज् कार्यान्वित होणार असून, त्यासाठी डीपीसीतून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सोमवारी दिली. या प्रयोगशाळांमुळे कोरोना संशयितांच्या नमुन्यांची विनाविलंब तपासणी होणार आहे.कोरानासंबंधी नमुने तपासण्यासाठी नागपूरला चार प्रयोगशाळा आहेत. अमरावती हे विभागीय मुख्यालय आहे; मात्र येथे एकही प्रयोगशाळा नाही. दोन प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात, यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. शासनस्तरावर हिरवी झेंडी मिळाल्यावर त्यांनी प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाला केल्या. तसे प्रस्तावही आलेत. नामदार ठाकूर यांनी त्यावर तातडीने कार्यवाही आरंभली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सदर प्रयोगशाळा सुरू होणार आहेत. उद्या किंवा परवा आवश्यक यंत्रसामग्रीची पूर्तता केली जाईल. केंद्राच्या आयसीएमआर प्राधिकरणाद्वारे आॅनलाइन चाचणी करण्यात आल्यानंतर या प्रयोगशाळांमध्ये कोरोनासंबंधी चाचण्या सुरू होतील. अन्य संसर्गजन्य आजारांच्याही चाचण्या तेथे करता येतील. वर्षभर या प्रयोगशाळांचा उपयोग करता येईल.नियोजन समितीतून निधीपालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन्ही प्रयोगशाळांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तसे निर्देश त्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले आहेत. यासंदर्भात नामदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी सोमवारी चर्चा केली. अमरावती विभागातील कोरोनाच्या चाचण्यांसाठीचे थ्रोट स्वॅब नागपूरच्या प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येत असल्याने अहवाल उशिरा प्राप्त होत आहेत. अमरावतीमध्ये दोन प्रयोगशाळा स्थापन झाल्यानंतर ही अडचण दूर होणार आहे.कोरानासंबंधी नमुने तपासण्यासाठी अमरावतीत दोन प्रयोगशाळा असाव्याच, अशी भूमिका मांडली. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आरोग्यमंत्रीही अनुकूल होते. डीपीसीतून मी निधी उपलब्ध करून दिला. एक-दोन दिवसात लॅब सुरू होतील.- यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या