बडनेरा : दारू पिऊन सतत शिवीगाळ करणाऱ्या बापाला दोन मुलांनी संगनमत करून ठार मारले. ही घटना बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी यादगिरे येथे ६ जून रोजी उशिरा रात्री घडली. याप्रकरणी आरोपी भावांना पोलिसांनी अटक केली आहे. वासुदेव अमरलाल ऊईके (४५) असे मृताचे तर अलकेश वासुदेव उईके (२०), मुकेश वासुदेव उईके (२७ रा.पिंपरी यादगिरे) अशी आरोपींची नावे आहेत. वासुदेव दारू पिऊन सतत शिवीगाळ करीत असे. त्याच्या या वागणुकीला मुले कंटाळळी होती. सोमवारी वासुदेवने पुन्हा दारू पिऊन शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त होऊन दोन्ही मुलांनी त्यांना लाकडी पट्ट्याने जबर मारहाण केली. यात वासुदेव उईकेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलीस पाटील गडलिंग यांनी बडनेरा पोलीस ठाण्याला दिली. सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांच्या फिर्यादीवरून भादंविच्या कलम ३०२, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेतील मृत आणि आरोपी हे मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी आहेत. ते मजुरी कामासाठी मागील आठ वर्षांपासून पिंपरी यादगिरे गावात राहात आहेत. (शहर प्रतिनिधी)
दोन भावांनी केला पित्याचा खून
By admin | Updated: June 8, 2016 00:01 IST