शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच विहिरीत आढळले दोन मृतदेह; हत्या की आत्महत्या? चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 11:40 IST

पिपलागड शिवारात देवी मंदिरासमोरील धुर्वे यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी सकाळी दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळावर कुठेही वाद झाल्याचे किंवा इतर खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, अशी चर्चा घटनास्थळावर होती.

ठळक मुद्देवरुड तालुक्यातील घटनापोलिसांकडून चौकशी सुरू

अमरावती : वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपलागड शिवारात देवी मंदिरासमोरील धुर्वे यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास शेतमजुरांना मृतदेह तरंगताना दिसला. घटनास्थळी दाखल झालेल्या शेंदूरजनाघाट पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर आणखी एकाचा शोध घेतला. विहिरीशेजारी दुचाकीसुद्धा उभी होती. दोन मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत हे इसापूर व उदापूर येथील रहिवासी आहेत. ही हत्या की आत्महत्या, अशी चर्चा घटनास्थळावर होती.

प्राप्त माहितीनुसार, भीमराव किसान कांबळे (६० रा . इसापूर), गणेश महादेव वानखडे (५३, रा. उदापूर) अशी मृतांची नावे आहेत. विहिरीजवळ एमएच २७ सीई ५२४४ क्रमांकाची दुचाकी उभी होती. ही घटना मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील वरुड तालुक्यातील पिपलागड देवी मंदिरासमोरील सीताराम धुर्वे यांच्या शेतात घडली. मृत गणेश वानखडे यांचे खापरखेडा शिवारात शेत असल्याने ते नेहमीच शेतात जात होते. रविवारी सायंकाळी ६ वाजता दोघेही शेतात गेले असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास धुर्वे यांच्या शेतात कामावर गेलेल्या शेतमजुरांना विहिरीत मृतदेह दिसला. याबाबत शेंदूरजनाघाट पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी जमादार कुंदन मुधोळकर, विलास कोहळे, अतुल मस्की यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी विहिरीशेजारी दुचाकी उभी होती, तर सुरुवातीला एक मृतदेह आढळून आल्याने एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुन्हा पोलिसांना संशय आल्याने विहिरीत गळ फिरविला. यावेळी दुसराही मृतदेह हाती लागला.

चर्चेला उधाण

इसापूर येथील भीमराव कांबळे आणि उदयपूर येथील गणेश वानखडे अशी मृतांची ओळख पटली. दोन्ही मृतदेह पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळावर कुठेही वाद झाल्याचे किंवा इतर खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे एकाच वेळी दोघेही विहिरीत पडले कसे हा प्रश्न ग्रामस्थांमध्ये चर्चेचा होता. या घटनेबाबत तर्कवितर्क काढण्यात येत असून हत्या की आत्महत्या, अशी चर्चा परिसरात आहे. घटनेचा पुढील तपास शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू