अमोहन राऊत - अमरावतीराज्यात आघाडी व युती तुटल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी वेगळी चूल मांडली व त्यातच अपक्षांची भाऊगर्दी वाढल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत दोन बॅलेट युनिटचा वापर होण्याची शक्यता आहे़ जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त लागणाऱ्या बॅलेट युनिटसाठी भारत निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे़ या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेली तर २५ वर्षांच्या शिवसेनेशी असलेले शिवबंधन भाजपाने तोडले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आखाड्यात चार राजकीय पक्षांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले आहेत़ त्यासोबतच राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षामध्ये बसपा, माकप, भाकप, मनसे यांचे उमेदवार रिंगणात आहेत़ मेळघाट मतदार संघ वगळता अमरावती-३३, अचलपूर-२९, धामणगाव रेल्वे-३०, तिवसा-२८, बडनेरा-२६, दर्यापूर मतदारसंघात ३१ उमेदवार रिंगणात आहेत़ राज्यस्तरीय नोंदणी पक्ष म्हणून गवई गट रिपाइं, खोब्रगडे गट रिपाइं, गोंडवाना गणतंत्र पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, भारीप बहुजन यासह अनेक राजकीय पक्षांनी या सातही मतदारसंघात नामांकन भरले आहेत़ सर्वांना त्यांच्या पक्षाचे अस्तित्व टिकवावयाचे असल्यामुळे ही निवडणूक लढणे गरजेचे आहे़ त्यात अपक्षांची भाऊगर्दी या मतदारसंघात आहे़
सात मतदारसंघांत लागणार दोन बॅलेट युनिट
By admin | Updated: September 29, 2014 00:37 IST