पालकामध्ये भीती : पोलिसांची नाकाबंदी गजानन नानोटकर पुसलास्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोरुन दोन मुलांना तृतीयपंथीयांनी पोत्यात डांबून पळवून नेल्याची चर्चा दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जोरदार रंगली. ही चर्चा वाऱ्यासारखी गावात पसरताच सर्व पालकांनी शाळेसमोर एकच गर्दी केली. आपले पाल्य सुरक्षित असल्याची शहानिशा केली. तर शेंदूरजनाघाट पोलिसांना ही माहिती मिळताच जिल्हयासह मध्यप्रदेशातील पांढुर्णा आणि मुलताई सिमेवर सुध्दा नाकेबंदी करुन वाहने तपासली. मात्र सांयकाळी साडेसहा वाजेपर्यंत त्या अपहृत मुलांचा शोध लागला नव्हता. ही अफवा तर नाही, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली. मात्र पोलिसांनी पुसला गावालगतचा संपूर्ण परिसर पिंजून काढला, हे विशेष. रात्रीपर्यंत ठाणेदार तळ ठोकून होते. पुसला या गावात दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेसमोरुन निळया रंगाच्या साडीत आलेल्या दोन तृतीयपंथीयांनी दोन मुले पोत्यात भरुन नेल्याची माहिती एका बोर विकणाऱ्या वृध्द महिला तसेच शाळेतील मुलांनी शिक्षकांना दिली. यावरुन तातडीने शिक्षकांनी दुचाकी घेवून सर्वत्र शोध घेतला तर पोलिसांना माहिती देताच शेंदूरजनाघाटचे ठाणेदार अशोक लांडे पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. शाळेला दुपारीच सुटीपुसला : सर्व शाळेतील पटसंख्या मोजण्यात आली तर गावात कुणाचे मुले बेपत्ता झाले काय? याचा पोलिसांनी शोध घेतला. सातव्या वर्गातील मुलांनी हा प्रकार पाहिल्याचे सांगितले त्यांचेकडूनही माहिती घेतली. समयसुचकतेने जिल्हयात सर्वत्र नाकेंबदी करुन मध्यप्रदेशातील पांढुर्णा, मुलताई सिमेवर आणि नागपूर जिल्हयातील सावनेर, काटोल, आष्टी येथेही नाकेबंदीकरीता माहिती दिली. तीन पथके तयार करुन चारही दिशेने जंगलपरिसरात पाठविण्यात आले. शाळेला साडे तीन वाजता सुटी देवून मुलांना घरी जाण्यास सांगितले. परंतु पोलिसांना व पुसला वासियांना साडेसहा वाजेपर्यत दोन मुले बेपत्ता असल्याची माहिती मिळाली नव्हती. ठाणेदार अशोक लांडे हे ताफ्यासह रात्री उशिरापर्यंत पुसला येथे तळ ठोकून होते.
तृतीय पंथीयांनी भरली दोन मुले पोत्यात ?
By admin | Updated: July 17, 2015 00:15 IST