लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यात दोन घटनांमध्ये नऊ व सव्वा लाखांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. दोन वर्षांपासून तालुक्यात बोगस बियाण्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे पोलीस तपासात पुढे येण्याची शक्यता आहे.दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला पी. व्यंकटेश परिमाला हा धामणगाव रेल्वे तालुक्यात तब्बल ५५ एकर शेती मक्त्याने करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे.तालुक्यातील देवगाव येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नऊ लाखांचे, तर विभागीय गुणनियंत्रण विभागाने तळणी येथे सव्वा लाखांचे बोगस बियाणे जप्त केले. पहिल्या नऊ लाखांच्या कारवाईतील आरोपी अद्याप तळेगाव दशासर पोलिसांच्या हाती लागायचे आहेत. मात्र, सव्वा लाखाच्या बोगस कपाशीच्या बियाण्याच्या जप्तीप्रकरणी पोलिसांनी व्यंकटेश परिमाला याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुरुवारी व्यंकटेशाची चौकशी केली. आंध प्रदेशातील प्रशासम् या जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला व्यंकटेश दोन वर्षांपासून धामणगाव तालुक्यातील तळणी हिंगणगाव या भागात तब्बल ५५ एकर शेती मक्ता पद्धतीने करतो. त्याने पहिल्या दिवशी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यात तालुक्यातील काही कृषिसेवा केंद्रे अडकण्याची शक्यता आहे. धामणगाव तालुक्यात बोगस बियाणे येत असल्याचा आम्हाला संशय होता, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे सांगत असले तरी पोलीस कारवाईपूर्वी कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई का केली नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. याप्रकरणी दोन दिवसांत आंध्रा लिंकवरून मोठी कारवाई होऊ शकते, असे तपास अधिकारी गजानन ठाकूर यांनी सांगितले.बोगस बीटी कपाशी बियाणे प्रकरणी एका तस्कराच्या मुसक्या काही दिवसांत आवळणार आहोत. आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात येणार आहे.- श्याम वानखडे, पोलीस निरीक्षक, मंगरूळ दस्तगिर
बोगस बियाण्यांतून कोट्यवधींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST
तालुक्यातील देवगाव येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नऊ लाखांचे, तर विभागीय गुणनियंत्रण विभागाने तळणी येथे सव्वा लाखांचे बोगस बियाणे जप्त केले. पहिल्या नऊ लाखांच्या कारवाईतील आरोपी अद्याप तळेगाव दशासर पोलिसांच्या हाती लागायचे आहेत. मात्र, सव्वा लाखाच्या बोगस कपाशीच्या बियाण्याच्या जप्तीप्रकरणी पोलिसांनी व्यंकटेश परिमाला याला ताब्यात घेतले आहे.
बोगस बियाण्यांतून कोट्यवधींची उलाढाल
ठळक मुद्देव्यंकटेश करतो ५५ एकर शेती : कृषी विभागाच्या आधी पोलिसांची कारवाई