शासनाकडून थट्टा : शिधापत्रिकेवर मिळणार किलोभर डाळजितेंद्र दखने अमरावतीतुरडाळीच्या भडकलेल्या दरांमुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांच्या ताटातील डाळ गायब झाली आहे. महागाईच्या या कचाट्यात जगणे अवघड होऊन बसले आहे. यापासून काहीसा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ५ जुलै रोजी अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिका कार्डधारकांना प्रत्येक महिन्याला एक किलो तूरडाळ देण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला आहे. मात्र या निर्णयावर जनसामान्यातून टिकेचा सूर उमटला आहे. बाजारामध्ये १२० ते १३० प्रतिकिलो दराने तूरडाळ उपलब्ध असतांना ५ ते ६ सहाजणांच्या कुटुंबाला १ किलो डाळ आणि तीही बाजारभावाने, ही गोरगरिबांची सरकारने केलेली थट्टाच असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. अनेकांना संताप व्यक्त करून १२० रूपयांनी नव्हे तर २० रूपयांनी डाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ९३२ कुटुंबांना ही डाळ १२० रूपये प्रतिकिलो मिळणार आहे.डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा शासनाला अपयश आले. यामुळे लोकांमध्ये शासनाविरोधी नाराजी पसरली आहे. यासाठी शासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्यातील ७० लाख कुटुंबांना रेशनिंगच्या माध्यमातून महिन्याला १ किलो तूरडाळ देण्यात येणार आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यामधील अंत्योदय १ लाख १७ हजार ९०४ आणि बिपीएलच्या १ लाख ६१ हजार २८ अशा दोन्ही मिळून २ लाख ७८ हजार ९३२ शिधापत्रिकाधारकांना ही डाळ स्वस्त धान्य दुकानात मिळणार आहे. मात्र तूरडाळीचे दर १२० रुपये किलो राहणार असल्यामुळे गोरगरीब नागरिकांना या दराने डाळ खरेदी करणे शक्य आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.डाळीबाबत आदेश नाहीतराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेशनिंगवर अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना तूरडाळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र याबाबत पुरवठा विभागाला अद्याप कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. याबाबत राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून जे आदेश मिळतील त्यानुसार स्वस्त धान्य दुकानामार्फत याबाबत अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.१२० रुपये प्रतिकिलो प्रमाणे तूरडाळ देण्याच्या निर्णयामुळे काहीही फरक पडणार नाही. दुकानात १२० रुपये तर बीपीएलवर २० रुपये किलोप्रमाणे तूरडाळ दिली पाहिजे. तरच गोरगरिबांना तूरडाळ खरेदी करता येईल.- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेसखरीप हंगामात तूृर पिकाची पेरणी झाली असली तरी प्रत्यक्षात फेब्रुवारी अखेरीस शेतकऱ्यांची तूर बाजारपेठेत येईल. मध्यंतरीच्या काळात सर्वसामान्यांना भाववाढीपासून वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुनील देशमुख,आमदार शासनाने रेशन दुकानातील इतर धान्या प्रमाणेच तूरडाळ सवलतीच्या दरात सर्व ग्राहकांना मिळायला पाहीजे. तूर डाळीबाबत पुरवठा विभागाच्या रेशन दुकानांना सुचना नाहीत.- सुरेश पाटील उल्हेअध्यक्ष, रेशन दुकानदार संघटनाबाजारपेठेत असलेल्या तूर डाळीच्या जुळत्या भावात स्वस्त धान्य दुकानात १२० रुपये प्रमाणे डाळ मिळत असली तरी त्यात गुणवत्ता राहणार नाही. - अजय गाडेसंघटन मंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत
बाजारदरानेच रेशन दुकानातही तूरडाळ
By admin | Updated: July 8, 2016 00:03 IST