लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : जरूडमध्ये पडलेल्या दरोड्याची शाई वाळते न वाळतेच शुक्रवारी नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी महेश कॉलनीमध्ये चोरी घडली होती. आठवडाभरात चार चोऱ्या झाल्याने व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे.नगर परिषद व्यापारी संकुलातील श्रीपाद चांदे यांच्या मालकीच्या दुकानाचे शटर १४ मार्चच्या मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, चौकीदार आल्याने चोराचा प्रयत्न फसला. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. तत्पूर्वी, १३ व १४ मार्च दरम्यान कल्पना नितीन गीद यांच्या महेश कॉलनी स्थित घरातून ३० हजार रुपये रोख, १५ ग्रॅम सोन्याची साखळी, ५० हजार रुपये, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्तीसह अर्धा किलो चांदीचे साहित्य असा मुद्देमाल चोरीला गेला. मुलताई चौकातील इंडियन ओव्हरसिज बँकेसह दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.शहरासह जरुडमध्येसुद्धा चोरीच्या घटना घडल्या. रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. रात्रीचे वेळी घराबाहेरील दिवे सुरू ठेवावेत. संशयास्पद अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना माहिती द्यावी.- दीपक वानखडे, ठाणेदार, वरुड
नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकान फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:19 IST
जरूडमध्ये पडलेल्या दरोड्याची शाई वाळते न वाळतेच शुक्रवारी नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी महेश कॉलनीमध्ये चोरी घडली होती. आठवडाभरात चार चोऱ्या झाल्याने व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे.
नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकान फोडण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देदिवसाआड चोरी : पोलिसांसमोर उभे ठाकले आव्हान