लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : बहिरम यात्रेतील एका राहुटीत १६ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास सागवान लाकडाने भरलेला ट्रक शिरला. यात त्या राहुटीसह ट्रकचे नुकसान झाले. चौकीदाराच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मांगिया गावातील राजपाल मानू भिलावेकर यांच्या घराचा लाकूडफाटा घेऊन एमपी ०९ केसी १०४६ क्रमांकाचा ट्रक बहिरम येथे दाखल झाला. रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान तो रस्त्याच्या कडेलाच असलेल्या चांदूर बाजार कृषिउत्पन्न बाजार समितीनजीकच्या राहुटीत घुसला. या राहुटीत पाच लोक जेवण करीत होते. चौकीदार दामोदर वानखडे (रा. कोंडवर्धा) हे जेवणास नकार देत राहुटीबाहेर खुर्ची टाकून बसले होते. ट्रक राहुटीच्या दिशेने येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला. यामुळे राहुटीत जेवत करीत असलेले पाचही जण बाहेर पडले. घटनेनंतर संतप्त यात्रेकरूंनी त्या ट्रकच्या काचा फोडल्या. त्यापूर्वी चालक ट्रक तेथेच सोडून घटनास्थळाहून पसार झाला. ट्रकमधील जुन्या व नव्या सागवान लाकडांबाबत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांना माहिती देण्यात आली. भड यांच्यासह वनरक्षक एन.बी. आहिरराव, ए.एम. निमकर, एस.डी. भांबूरकर यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले आणि लाकडाने भरलेला तो ट्रक परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात आणला. ट्रकमध्ये लाखो रुपयांचे मोठे, नवीन सागवान लाकडाचे नग होते. त्यावर घरची जुनी लाकडे टाकली होती. पण, या कुठल्याही लाकडावर त्याचे मोजमाप आणि हॅमर लागलेले नव्हते.व्याघ्र प्रकल्पाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास आवश्यक दस्तावेज घेऊन परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात दाखल झालेत. शिरजगाव कसबाचे वनपाल अभिजित ठाकरे यांनी त्या दस्तावेजांच्या अनुषंगाने लाकडाची तपासणी केली. ते लाकूड मांगीया गावातील पुर्नवसित कुटुंबाच्या घराचे असल्याची खात्री पटल्याने ट्रकला पुढील प्रवासाकरिता परवानगी देण्यात आली.
बहिरम यात्रेतील राहुटीत शिरला ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मांगिया गावातील राजपाल मानू भिलावेकर यांच्या घराचा लाकूडफाटा घेऊन एमपी ०९ केसी १०४६ क्रमांकाचा ट्रक बहिरम येथे दाखल झाला. रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान तो रस्त्याच्या कडेलाच असलेल्या चांदूर बाजार कृषिउत्पन्न बाजार समितीनजीकच्या राहुटीत घुसला. या राहुटीत पाच लोक जेवण करीत होते. चौकीदार दामोदर वानखडे (रा. कोंडवर्धा) हे जेवणास नकार देत राहुटीबाहेर खुर्ची टाकून बसले होते.
बहिरम यात्रेतील राहुटीत शिरला ट्रक
ठळक मुद्देचौकीदाराचे प्रसंगावधान : जीवितहानी टळली