शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

ट्रकने सायकलस्वाराला चिरडले

By admin | Updated: October 11, 2016 00:08 IST

सिंलिडरच्या ट्रकखाली चिरडून सायकलस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मर्च्युरी टी पॉर्इंटवरील घटना : ट्रकचालक पसार, वाहतूक विस्कळीतअमरावती : सिंलिडरच्या ट्रकखाली चिरडून सायकलस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मर्च्युरी टी-पॉर्इंटवर सोमवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली. संतोष मोहिते (३७,रा. कारंजा लाड, ह.मु.विलासनगर) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. इर्विननजीकचा मर्च्युरी टी-पॉर्इंट अपघात प्रवणस्थळ बनले असून आतापर्यंतच्या अपघातात तिघांचा बळी गेला आहे. सिंलिडरने भरलेला ट्रक क्रमांक एम.एच. २७-एक्स.-५६९३ इर्विनकडून जयस्तंभ चौकाकडे भरधाव जात होता. दरम्यान सायकलस्वार संतोष मोहिते हा ट्रकच्या मागच्या चाकात येऊन चिरडला गेला. ट्रक संतोष मोहिते यांच्या डोक्यावरून गेल्याने घटनास्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. वर्दळीच्या मार्गावर अपघात घडल्याने वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. तिन्ही बाजुंनी येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच शहर कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.एस.सूर्यवंशी, पीएसआय गोकुल ठाकूर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु केले. इर्विन रूग्णालयातून तत्काळ स्ट्रेचर बोलावून मृतदेह उचलण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांना सुरूवातीला कठीण झाले होते. मृताच्या पॅन्टच्या खिशात मोबाईल व एक डायरी आढळून आली. त्यावरील मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी सपर्क केला असता नातलगांकडून मृतदेहाची ओळख पटली. मृत संतोष मोहिते हा शहरातील एका दूध डेअरीवर काम करीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तो मूळचा कारंजा लाड येथील रहिवासी असून अमरावतीत संतोषचे सासर आहे. विलासनगरात भाड्याने खोली करून तो राहात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. (प्रतिनिधी)