शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रायबलचे आठ प्रकल्प अधिकारी लोकलेखा समितीच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 18:22 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे आठ प्रकल्प अधिकारी विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या रडारवर आहेत.

अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे आठ प्रकल्प अधिकारी विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या रडारवर आहेत. त्याअनुषंगाने बुधवार, ६ जून रोजी ट्रायबलच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांची लोकलेखा समितीसमोर साक्ष नोंदविली जाणार आहे. त्यामुळे आठपैकी किती प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाईची कु-हाड कोसळते, हे स्पष्ट होईल.आदिवासी समाजाचा विकास, उत्थानासाठी राबविल्या जाणा-या विविध योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी प्रायोगिक तत्त्वावर आठ प्रकल्प कार्यालयांच्या तपासणी केली होती. यात सन २०१४-१५ या वर्षात राबविण्यात आलेल्या योजना, उपक्रमांवर झालेला खर्च, अनुदान शिलकीबाबत परीक्षण केले होते.आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयांतर्गत नाशिक, नंदुरबार, जव्हार, डहाणू, धारणी, पांढरकवडा, नागपूर व चंद्रपूर येथील प्रकल्प कार्यालयांचा समावेश होता. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी सामान्य आणि सामाजिक क्षेत्राला अहवाल प्राधान्य दिले होते. त्याअनुषंगाने आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृहे, योजनांवर होणारा खर्च, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा, योजनांवर अखर्चित निधी, आदिवासी शेतक-यांना अनुदानवाटपात त्रुटी, शिष्यवृत्तीत घोळ, अर्थसंकल्पात तरतुदीनुसार खर्चात बचत आदी विविध बाबींवर कॅगने परीक्षण करताना लक्ष वेधले होते. त्यानुसार आठही प्रकल्प अधिका-यांनी आदिवासी समाजाच्या विविध योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करताना दिरंगाई केल्याची बाब कॅगच्या निदर्शसनास आली होती. योजना, उपक्रमांसाठी आलेले अनुदान, निधी अखर्चित ठेवण्यात पीओ दोषी असल्याचा अहवाल यापूर्वी कॅगने राज्य शासनाकडे सादर केला आहे. कॅग परीक्षणाच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांना मुंबई विधान भवनाच्या १९ व्या माळ्यावर बुधवारी राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीपुढे साक्ष नोंदवावी लागणार आहे. दुसरीकडे आदिवासींना विविध योजना, उपक्रमाच्या लाभापासून वंचित ठेवणा-या प्रकल्प अधिका-यांची विकेट घेण्यासाठी लोकलेखा समितीने तयारी चालविल्याची माहिती आहे.मनीषा वर्मा यांच्या दालनात अधिका-यांची बैठकआदिवासी समाजाच्या विविध योजना, उपक्रमात उणिवा असल्याबाबत राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीसमोर मनीषा वर्मा यांना साक्ष नोंदवावी लागणार आहे. तत्पूर्वी, मंगळवार, ५ जून रोजी प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी त्यांच्या दालनात पूर्वचर्चेच्या अनुषंगाने अपर आयुक्त, प्रकल्प अधिका-यांची बैठक घेऊन माहिती जाणून घेतली. कॅगने परीक्षणात नोंदविलेल्या आक्षेपांबाबतची काही कागदपत्रे संबंधित अधिका-यांनी मनीषा वर्मा यांना दिल्याची माहिती आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती