शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींची 'बेरोजगारी', 'वनहक्क', अन् 'पेसा' कायद्याची कायम जैसे थे

By गणेश वासनिक | Updated: April 11, 2024 19:10 IST

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेला ऐतिहासिक न्यायनिर्णयानुसार रेल्वे, बँका, पोस्ट ऑफिस, दूरसंचार व इतरही विभागात गैर आदिवासींनी आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा बळकावलेल्या आहेत.

अमरावती: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. प्रचाराचा ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. उमेदवार प्रत्येक समाजाच्या समुहापर्यंत, घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. समुह, समाजाचे प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. मात्र आदिवासी समाजाचे प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडून आहे. कोणत्याही सरकारने आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाहीत. त्यामुळे आदिवासींचे अनेक दशकापासूनचे प्रश्न सुटलेले नाहीत. परिणामतः आदिवासी समाज हा घटनात्मक हक्कापासून दूरच आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेला ऐतिहासिक न्यायनिर्णयानुसार रेल्वे, बँका, पोस्ट ऑफिस, दूरसंचार व इतरही विभागात गैर आदिवासींनी आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा बळकावलेल्या आहेत. केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासकीय विभागाने दिलेल्या २७ हजार ६५३ पैकी २७३ प्रकरणांची सीबीआयने प्राथमिक चौकशी केली आहे. केंद्र सरकारच्या सेवेत ३० टक्के पेक्षा जास्त गैरआदिवासी असल्याचा सीबीआयचा निष्कर्ष आहे. अंदाजे हा आकडा ३ लाखाच्या घरात आहे. परंतु अद्यापही त्या जागा रिक्त करुन खऱ्या आदिवासी समाजातून भरलेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी बेरोजगार आता नेमका कोणता पवित्रा घेतात, याकडे लक्ष लागले आहे.१) केंद्र सरकारने आदिवासी समाजासाठी २००६ मध्ये वनहक्क कायदा तयार केला. या कायद्यानुसार वनांचे व तेथील जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी स्थानिक लोकांवर टाकली आहे. मात्र देशभरात वनहक्कापासून १० लाख कुटुंब वंचित आहेत. वनहक्क कायदा तयार होऊन १८ वर्षे झाली. परंतु अद्यापही आदिवासी समाजबांधवांना वनहक्क मिळाले नाही. उलट त्यांना वनांमधून विकासाच्या नावांवर हुसकावून लावल्या जात आहे. विस्थापित केल्या जात आहे.२) 'पेसा कायदा' कायदा केंद्र सरकारने १९९६ मध्ये अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींसाठी तयार केला आहे. या कायद्यानुसार आदिवासी समाजाच्या परंपरा, स्थानिक नियोजनाबाबत ग्रामसभांना अधिकार दिले आहे. येथे 'ग्रामसभा सर्वोच्च' असून केंद्र अथवा राज्यसरकारचे कायदे लागू होत नाही. गेल्या २८ वर्षापासून आजपर्यंत केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करुन पेसा कायद्याशी सुसंगत असे कायदे तयार केले नाहीत. 'पेसा कायदा' इतर कायद्यापेक्षा वरचढ असूनही अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समाजाला त्याचा फारसा लाभ होत नाही.

टॅग्स :Amravatiअमरावती