शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
3
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
4
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
5
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
6
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
7
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
8
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
9
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
10
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
12
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
13
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
14
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
15
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
16
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
17
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
18
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
19
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
20
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं

आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू प्रकरण विधिमंडळात, श्रीकांत देशपांडे यांची लक्ष्यवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 20:50 IST

अमरावती : शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध कारणांनी झालेले मृत्यू प्रकरण विधिमंडळात गाजणार आहे. आ. श्रीकांत देशपांडे यांनी लक्ष्यवेधी सादर केली असून आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.

अमरावती : शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध कारणांनी झालेले मृत्यू प्रकरण विधिमंडळात गाजणार आहे. आ. श्रीकांत देशपांडे यांनी लक्ष्यवेधी सादर केली असून आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षात संर्पदंश, आजार, संस्थाचालकांचे दुर्लक्ष, सोयी-सुविधांचा अभाव, अवेळी औषधोपचार आदी कारणांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आश्रमशाळा, वसतिगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा, शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी शासन अनुदान देते. मात्र, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची मालिका सातत्त्याने सुरू असल्याचे लक्ष्यवेधीतून आ. देशपांडे यांनी मांडली. ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालयांतर्गत २९ प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्थ आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची संख्या, मृत्यूची कारणमीमांसा, दोषींवर कारवाई, पोलिसात तक्रार आदी बाबी लक्ष्यवेधीतून मांडण्यात आल्यात. विशेषत: ५२२ अनुदानित तर ५५४ शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रशासकीय अनास्थेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. आ. देशपांडे यांनी सादर केलेल्या लक्षवेधीची माहिती सभागृहात वेळीच प्राप्त व्हावी, यासाठी विधिमंडळ कामकाज सचिवालयांनी आदिवासी विकास विभागाच्या चारही अपर आयुक्तांना त्यांच्या अधिनस्थ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती पाठविण्याच्या सूचना प्रत्राद्वारे दिल्या आहेत.अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलचा मुद्दा गाजणारअमरावती येथील महर्षी पब्लिक स्कुलमध्ये इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाºया रोशन सावलकर या आदिवासी विद्यार्थ्याचा प्रदीर्घ आजाराने ३ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाल्याचे प्रकरण विधिमंडळात गाजणार आहे. संस्थाचालकांच्या दुर्लक्षाने आदिवासी विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार होऊ शकला नाही, असे पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला आहे. याप्रकरणी लक्ष्यवेधी सादर केल्याचे आ. श्रीकांत देशपांडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावती