शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील आदिवासी शेतकरी छतावर घेतात पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:42 IST

मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता घराच्या छतावरच गावात पाऊस किती झाला, याची नोंद घेऊ लागले आहेत.

ठळक मुद्देमेळघाटातील ११ गावांत प्रयोग घरी बनविले पर्जन्यमापक यंत्र

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता घराच्या छतावरच गावात पाऊस किती झाला, याची नोंद घेऊ लागले आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यातील ११ गावांमध्ये हा प्रयोग सुरू झाला असून, यातून पिण्याच्या पाण्यासह पिके कोणती घ्यावी, या महत्त्वपूर्ण बाबीवर चर्चा करीत भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा सामना उन्हाळ्यात आदिवासींना करावा लागला. त्या उन्हाच्या गुन्ह्याच्या चटक्यात पाण्याचे महत्त्व चांगल्या प्रकारे शंभरपेक्षा अधिक गावांना कळले आहे. त्यामुळे कालपर्यंत श्रमदानासाठी नकार देणाऱ्या आदिवासी आता स्वत:हूनच पाण्यासाठी पुढाकार घेतला. वॉटर कप स्पर्धा अंतर्गत अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता थेट आपल्या गावात पाऊस किती झाला, त्याचे नियोजन कसे करायचे, या सर्व गोष्टी त्यांना वॉटर कप स्पर्धेच्या चमूने समजावून सांगताच त्यावर अंमलबजावणीही झाली.कमी खर्चात पर्जन्यमापक यंत्रटाकाऊ वस्तूंपासून अगदी कमी खर्चात पर्जन्यमापक यंत्र तयार करण्यात आले आहे. उंच भागासह घरावरील छतावर ते ठेवण्यात आले असून, त्यात पावसाची नोंद घेतली जात आहे. पर्जन्यमापक यंत्रासाठी समान व्यास असलेली काचेची किंवा प्लास्टिकची बरणी आणि एक स्केलपट्टी घेतल्यानंतर उंच भागावर ती पडू किंवा हलू नये, यासाठी चार विटांच्या मधात वाळू व त्यात वाईट सिमेंट टाकून घट्ट करण्यात येते. उन्हाळ्यात असे यंत्र लावण्यात आले असून, त्यात एका वही व दररोज पर्जन्यमानाचे नोंद घेतली जात आहे.पिण्याचे पाणी ते पेरणीपर्यंत फायदाआपल्या गावात पाऊस किती झाला, याची नोंद मेळघाटात कुठल्या गावात आजपर्यंत नव्हती. तालुकास्तरावर होणारी पावसाची नोंद ही त्या गावातली असल्याने उन्हाळ्याच्या नियोजनासह कुठले पीक घ्यावे, हे परंपरागत अनुभवावरून ठरत होते. आता गावात पावसाची नोंद होऊ लागल्याने पिण्यासाठी किती आवश्यक, गहू घ्यायचा की हरभरा, खरीप-रबीत कुठले पीक घ्यायचे आदी नियोजन करता येणार असल्याचे वाटर कप स्पर्धेचे स्वयंसेवक मनोज कुयटे यांनी ‘लोकमत’ला सांगितलेगावात वॉटर बजेटगावात पडणाऱ्या पावसाचा ताळेबंद मेळघाटात आता होणार आहे. पर्जन्यमापक यंत्रातून गावात एकूण पाऊस किती झाला, याची नोंद चिखलदरा तालुक्यात शेतकरी चार ठिकाणी होते. कुलंगणा येथे साधुराम खडके, मोथा येथे तेजु शेळके, बामादेही येथे राणू बेठेकर, आवागड येथे भानू चिमोटे ही नोंद घेतात. धारणी तालुक्यात बेरदाबल्डा, दहेंडा, बोथरा, चुटिया, घुटी, मान्सुवडी, बोबदो या गावांमध्ये नोंदी घेतल्या जात आहेत. 

टॅग्स :Melghatमेळघाट