शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील आदिवासी शेतकरी सावकारी पाशातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

चिखलदरा पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर यांनी सोमवारी परतवाडा येथील सहायक उपनिबंधक कार्यालय गाठले. चिखलदरा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांवरील सावकारी कर्ज शासनाने आदेश देऊनही माफ का झाले नाही, याबाबत सहायक उपनिबंधक अच्युत उल्हे यांना विचारणा केली.

ठळक मुद्देसांगा कर्ज कुणाचे झाले माफ? : पावत्या असताना गहाण सोडविल्याची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ तर झालेच नाही; मात्र सावकाराच्या गहाण पावत्या शेतकऱ्यांकडे असताना शासनदप्तरी ते गहाण सोडविण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. येथील सहायक निबंधक कार्यालयात आदिवासी शेतकऱ्यांनी धडक दिली. या प्रकरणात लाखोंचे गौडबंगाल असण्याची शक्यता वर्तविली जाते.चिखलदरा पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर यांनी सोमवारी परतवाडा येथील सहायक उपनिबंधक कार्यालय गाठले. चिखलदरा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांवरील सावकारी कर्ज शासनाने आदेश देऊनही माफ का झाले नाही, याबाबत सहायक उपनिबंधक अच्युत उल्हे यांना विचारणा केली. तेव्हा बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ झाल्याची नोंद त्या यादीत आढळून आली. उर्वरित शेतकऱ्यांना या समितीने बाद केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.याप्रकरणी संबंधित सावकारांशी हातमिळवणी करून आदिवासींचा गहाण ठेवलेला लाखोंचा मुद्देमाल हडप केल्याचा आरोप सभापती बन्सी जामकर यांनी केला. सखोल चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यावेळी बाबूलाल बेलसरे, गजानन खडके, परसराम खडके, सीताराम खडके, सुरेश बेलसरे, शेषराव कासदेकर, लक्ष्मण खडके, रूपराव कासदेकर, दयाराम बेलसरे, किसना बेलसरे, मधु खडके, गजू कासदेकर आदी उपस्थित होते.महाआघाडी सरकारने पाच महिन्यांपूर्वी राज्यातील शेतकºयांना सावकारी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता.पावत्या घरात; यादीत सोडविल्याची नोंदशासनाने २०१५ मध्ये सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी सावकारी कर्ज माफ करण्याची योजना आणली. त्यानुसार चिखलदरा तालुक्यातील सावकारी कर्ज उचललेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी अर्ज केले. मात्र ते सर्व धूळ खात पडून आहेत. जिल्हास्तरीय निवड समितीने सावकारांकडील गहाण आदिवासी शेतकऱ्यांनी सोडल्याचा शेरा दिला. प्रत्यक्ष गहाण ठेवल्याच्या पावत्या शेतकऱ्यांकडे आहेत. हे अपहाराचे उदाहरण ठरले आहे.