--------------
तळेगाव दशासर ग्रामस्थांना बोअरचा आधार
तळेगाव दशासर : गावात राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा नळ योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. अर्ध्या गावाला जुन्या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असून, इतरांना खासगी बोअरचा आधार घेऊन तहान भागवावी लागत आहे. येथे पाणीपुरवठा करण्यासाठी सन २०१३ मध्ये दोन कोटी रुपयांच्या पेयजल पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र आठ वर्षानंतरही ती पूर्णत्वास गेलेली नाही.
---------------
मंगरूळमधील रस्त्याची झाली दुर्दशा
मंगरूळ दस्तगीर : पाणीपुरवठा योजनेसाठी गावातील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे हे गाव त्या खोदकामामुळे भकास झाले आहे. ही योजना जलसंजीवनी ठरणार असताना, जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. या गावातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने किरकोळ अपघातदेखील वाढले आहेत.
-------------------
फोटो पी ०६ अंकुश
निवड
अंकुश गावंडे
नांदगाव खंडेश्वर : राज्यातील शिक्षणक्षेत्रातील विविध नामवंत, उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन करण्यात आला आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ चव्हाळा येथे कार्यरत तंत्रस्नेही शिक्षक अंकुश गावंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
--------------------
सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे प्रकट दिन
अमरावती : कोरोना महामारीचे संकट दूर जाऊ दे, सर्वांना या आजारातून बरे कर, अशी प्रार्थना संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त सिद्धिविनायक मित्र मंडळाने कठोरा मार्गातील सिद्धिविनायकनगर येथे असलेल्या मंदिरात केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, अत्यंत साध्या व कमी उपस्थितांमध्ये सिद्धिविनायक मित्र मंडळाने प्रकटदिन साजरा केला.
-----------------------
निवड
फोटो पी ०६ सुषमा कोठीकर
सुषमा कोठीकर यांना कलानगरी हिरकणी पुरस्कार
अमरावती : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्य तथा सरस्वती विद्यालय येथे सहायक शिक्षिका पदावर कार्यरत सुषमा योगेश कोठीकर यांना कलानगरी वेलफेअर सोसायटीच्यावतीने कला क्षेत्रातील ‘हिरकणी २०२१’ हा पुरस्कार जाहीर झाला. कोठीकर या नाटयकर्मी असून, त्या नाट्यनिर्मिती करतात.
-------------
फोटो वरूड पी ०६
विद्यार्थिनी, खेळाडू पंचायत समितीकडून सन्मानित
वरूड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून एमकॉम परीक्षेत विद्यापीठातून प्रथम आलेल्या बेनोडा (श.) येथील कविता तळखनकर, बीएससी परीक्षेत विद्यापीठातून सहावी मेरीट आलेल्या इसंब्री येथील अश्विनी धांडे या विद्यार्थिनींसह पोतुर्गालमध्ये लिस्बनला होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या टेंभुरखेडा येथील चेतन दवंडे यांचा पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांनी सत्कार केला.
---------------------
शिवमंदिर डीबीवरून वीजपुरवठा खंडित
कुऱ्हा : अंजनवती शिवारातील शिवमंदिर डीबीवरून थ्रीफेज विद्युत पुरवठा १ मार्चपासून खंडित करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर डीबी दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरात नागरिकांना महावितरणकडे केली आहे.
-------
पान ३ साठी सारांश