शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास निधीचे होणार आॅडिट, अ‍ॅनालिसीस; विधिमंडळ आमदार समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 17:38 IST

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र, हा निधी कोठे, कसा खर्च होतो याचे नियोजन नसल्याने योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहतात.

अमरावती : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र, हा निधी कोठे, कसा खर्च होतो याचे नियोजन नसल्याने योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे आता आदिवासी विभागाचा निधी कोठे खर्च करण्यात आला, याचे आॅडिट, अ‍ॅनालिसीस केले जाईल, अशी माहिती अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आ.अशोक उईके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आदिवासी विकास विभागाचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे अथवा नाही? याच्या चाचपणीसाठी विधिमंडळ आदिवासी आमदार समिती राज्यभर दौरे करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. उईके यांनी बोलत होते. नाशिकनंतर नागपुरात ४ आॅक्टोबर रोजी विदर्भस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आदिवासी विकास विभागातील नोकर भरती, पदोन्नतीे, रिक्त पदांची संख्या, बिंदूनामावली विलंबनाची कारणे तसेच वसतिगृह, आश्रमशाळांमध्ये दुरवस्था आदींबाबत माहिती समितीने जाणून घेतली. विशेषत: आदिवासी विकास विभागात येणारा निधी अन्य १३ यंत्रणांकडे विकासकामे, योजना, उपक्रम राबविण्यासाठी वळती केला जातो. परंतु एकदा वळता झालेला निधी व्यवस्थितरीत्या खर्च झाला अथवा नाही? याचे आॅडिट केले जात नाही. त्यामुळे आदिवासींच्या नावे येणा-या निधीवर दुसरेच लाभार्थी निधी पळवितात, ही बाब समितीने अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समिती अध्यक्ष उईके यांनी सांगितले. कृषी, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग व आरोग्य विभागाकडे दरवर्षी मोठ्या रक्कमेचा निधी विकासकामांच्या खर्चासाठी पाठविला जातो. मात्र या निधीचे विनियोग नीट झाले किंवा नाही? याबाबत अहवाल प्राप्त होत नाही. त्यामुळे आता आदिवासी विकास विभागाने अन्य यंत्रणांना दिलेल्या निधीचे आॅडिट, अ‍ॅनालिसीस आमदार समिती करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आदिवासी लाभार्थ्यांची यादी मंजूर करताना ते बोगस असू नये, ही बाबसुद्धा ट्रायबल आमदार समितीने नागपूरच्या अपर आयुक्त माधवी खोडे, अमरावतीचे गिरीश सरोदे यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे आ.उईके म्हणाले. तसेच आमदार समितीने सूचविलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन अधिकाºयांनी केले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे समितीने आढावा बैठकीत स्पष्ट केले आहे. यावेळी आ.देवराव होळी, आ.वैभव पिचड, आ.बरोरा, आ. श्रीकांत देशपांडे, आ.आनंद ठाकूर, आ.पास्कर धनारे आदी अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य उपस्थित होते.

‘शासनाकडून आदिवासींच्या विकासासाठी प्रचंड निधी येतो. परंतु हा निधी कोठे खर्च केला जातो, याबाबत विश्र्लेषण करणे काळाची गरज आहे. त्यामुळे समितीने निधीबाबतचे आॅडिट, अ‍ॅनालिसीस करण्याचे ठरविले आहे.- अशोक उईक,अध्यक्ष, अनुसूचित जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र

टॅग्स :Amravatiअमरावती