शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

हक्काच्या घरकुलापासून आदिवासी वंचित

By admin | Updated: November 2, 2014 22:27 IST

कष्टाळू आणि काटक म्हणून ओळखला जाणारा आदिवासी समाज सहसा जंगलात वास्तव्य करणारा असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने शहराकडे धाव घेतली आहे.

सुनील देशपांडे- अचलपूरकष्टाळू आणि काटक म्हणून ओळखला जाणारा आदिवासी समाज सहसा जंगलात वास्तव्य करणारा असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने शहराकडे धाव घेतली आहे. या आदिवासी समाजाला हक्काचे निवासस्थान मिळावे यासाठी काँग्रेस शासनाच्या कारकिर्दीत शबरी आदिवासी घरकूल योजना लागू करण्यात आली होती. अचलपूर नगर पालिकेच्या व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जुळ्या शहरातील स्थानिक आदिवासींना शबरी घरकूल योजनेचा लाभ अजूनपर्यंत मिळू शकला नाही. 'लोकमत'ने याबाबत केलेल्या सर्व्हेमध्ये अनेक बाबी समोर आल्या. त्यात प्राप्त झालेल्या माहितीनुसार सासनाकडून जंगालाचे संरक्षणाचे कायदे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने जंगलात मुक्तसंचार करणारा आदिवासी समाज कुटुंबासह शहरी भागाकडे धाव घेऊ लागला आहे. रोजगार मिळण्यासाठी मेळघाटसह आदी भागातून आलेल्या आदिवासी कुटुंबांपैकी अचलपूर परतवाड्यात अंदाजे २०० पेक्षा जास्त कुटुंबं स्थायिक कसे तरी जीवन जगत असताना त्यांना अचलपूर-परतवाड्यातील मुगलाईपूरा कालीमातानगर, आझादनगर, पेन्शनपुरा, अब्बासपुरा, विलायतपुरा, सुलतानपुरा आदी ठिकाणी यांची कुटुंबे स्थायिक झालेली आहेत. ही आदिवासी कुटुंबे अनेक संकटांचा सामना करीत जीवन जगण्यासाठी धडपडत आहेत. त्यातील कित्येकांच्या घरात विद्युत पुरवठा नाही. पाणी पुरवठ्याचा नळ नाही. काही ठिकाणी तर नगरपरिषद साधी टॅक्स पावतीही फाडत नसल्याने या आदिवासी कुटुंबांना या प्राथमिक सुविधांपासून वंचित रहावे लागते. प्रत्येक आदिवासी कुटुंबाला हक्काचे घरकूल मिळावे यासाठी काँग्रेस शासनाने आदिवासी योजना सुरु केली होती. या योजनेचे २०१३ साली नाव बदलवून शबरी आदिवासी घरकूल योजना असे ठेवण्यात येऊन एका घरकुलासाठी १ लाख ५० हजार तर महानगरपालिका क्षेत्रात १ लाख ८० हजार रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेविषयी नगर पालिका प्रशासन अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील ग्रामीण भागातही ही योजना राबविली गेली नाही. नगरपालिकेत दोन नगरसेवक अनुसूचित जाती प्रवर्गातील असून त्यांनीही ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.