शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महामंडळाला व्यवस्थापकाचा चुना, लक्षावधींचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:21 IST

मेळघाटातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध उपयोजना राबविल्या जात असताना धारणी येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकाने लाखोंचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.

 अमरावती - मेळघाटातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी  आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध उपयोजना राबविल्या जात असताना धारणी येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकाने लाखोंचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होऊ घातलेल्या आदिवासी विभागाच्या ४४ व्या वार्षिक आमसभेकडे लक्ष लागून राहिले आहे. या आमसभेत मेळघाटातील अपहाराचा मुद्दा गाजणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आदिवासी उपयोजनेंतर्गत धान्य एकाधिकार योजना चालविण्यात येते. आदिवासी शेतकºयांची लूट होऊ नये व त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, हेच योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु धारणी येथे कार्यरत तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक एस.एस.सांभारे यांनी सर्व नियम पायदळी तुडवीत योजनेत अपहार करून शासनाला लाखोंचा चुना लावला. यासंदर्भात शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष शैलेंद्र मालवीय यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यासह संबंधितांकडे तक्रार केली होती. सांबारे यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळात केलेले कारनामे उघड होताच त्यांचे नाशिक येथे स्थानांतरण करण्यात आले. महामंडळाच्या महाव्यवस्थापकांची (प्रशासन) मेहेरनजर असल्याने मेळघाटातील गोदामात सात हजार क्विंटल तूर  दर येऊनसुद्धा विकण्यात आली नाही, तर चना कमी दराने विकून महामंडळाला १२ लक्ष रूपयांचा चुना लावण्यात आला. जिल्हाभरात फक्त पाच व्यापाºयांनी जाहीर लिलावात मालाची बोली केली. सेवानिवृत्त ग्रेडरकडून नाफेडमार्फत व्यापा-यांची तूर खरेदी करून शासनाची फसवणूक सांभारे यांनी केल्याचा आरोप करीत अशा अनेक अपहारांची तक्रार मालवीय यांनी केली आहे.

आमसभेत उचलणार मुद्दा आदिवासी विकास महामंडळाची ४४ वी वार्षिक आमसभा शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे. त्यात मेळघाटातील या भ्रष्टाचाराचे मुद्दे, राज्यातील आदिवासी मंडळाचे संचालक, शिवसेनेचे आदिवासी आमदार प्रामुख्याने उचलणार असल्याचे तक्रारकर्ता शैलेंद्र मालवीय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार