शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

‘आधार’द्वारा मेळघाटातील आदिवासी बांधवांना मायेची पाखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:44 IST

आपण सुखी आहोत काय, याऐवजी आपण किती जणांना सुखी करू शकतो व हाच खरा जीवनाचा आनंद आहे. याच कार्याने झपाटलेल्या धेयवेड्या युवकांनी मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या वस्त्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील नागरिकांना मदतीची हाक दिली.

ठळक मुद्देसमाजॠणाची ऊतराई : नागरिकांच्या दातृत्वातून एक लाख २० लाखांवर वस्त्रांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आपण सुखी आहोत काय, याऐवजी आपण किती जणांना सुखी करू शकतो व हाच खरा जीवनाचा आनंद आहे. याच कार्याने झपाटलेल्या धेयवेड्या युवकांनी मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या वस्त्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील नागरिकांना मदतीची हाक दिली. तीन वर्षांत तब्बल २६ वेळा मेळघाटातील अतीदुर्गम गावांमध्ये स्वखर्चाने जाऊन एक लाख २० हजारांवर वस्त्रांसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. समाजॠणाची ऊतराई करण्याचा आगळावेगळा संकल्प ‘आधार फाऊंडेशन’द्वारा करण्यात आला आहे.मेळघाटात पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या प्रचाराला गेलो असताना तेथील वस्तुस्थिती अनुभवास आली अन् त्याचक्षणी आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी संकल्प केल्याचे प्रदीप बाजड यांनी सांगितले. याला दिलीप हटवार, अनिल ढवळे, महेंद्र शेंडे, रामेश्वर वसू, अनंत बाजड, राजेश डिगवार, संजय राऊत, दीपक भेलकर, अरविंद विंचुरकर, चित्रा ढवळे, सविता बाजड आदींची साथ मिळाल्यानेच पाहता पाहताकपडे हा उपक्रम एक सामाजिक चळवळ बनल्याचे बाजड म्हणाले.यासाठी शहरात कलेक्शन सेंटर आहेत. ७० ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना वस्त्रदानाचे आवाहन केले असता, दर महिन्यांत पाच ते सात हजार कपडे या सेंटरवर जमा होतात. या कपड्यांचे ग्रेडींग करून व त्याचे गठ्ठे बांधून दर महिन्याला स्वखर्चाने मित्रांसोबत तर कधी परिवारासोबत जावून तेथे कपडे वाटण्यात येत आहे. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहरावरचा आनंद पाहून आपण जे काही करत आहे. त्या सामाजिक कार्याची पोचपावती त्याचक्षणाला मिळते. २ आॅक्टोबर २०१५ सुरूवात केलेल्या उपक्रम नागरिकांच्या दातृत्वामुळेच फलद्रुप होत असल्याचे बाजड यांनी आवर्जून सांगितले. समाजात वावरत असताना कळत नकळत समाजघटकांचे ॠ ण आपल्यावर होते, त्या समाजॠणाची ऊतराई करण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.आपादग्रस्थांनाही मदतीचा हातकेवळ मेळघाटातच नव्हे, तर अमरावती शहरात उत्तमनगरातील घराला लागलेल्या आगीत खोब्रागडे कुटुंब निराधार झाले. त्या परिवाराला हातगाडी, शिलाई मशीन, धान्य, तेलाचा डबा, व तीन हजारांची मदत याशिवाय मेळघाटात सेमनाडोह परिसरात लागलेल्या आगीत बाधित झालेल्या ढाना, भवाई येथील परिवारांना वस्त्रांसोबत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. आपल्याला ज्या वस्तूंचे काम नाही, त्या जर या केंद्रावर जमा केल्या तर यामधून अनेकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात, हे आधार फाऊंडेशनने दाखवून दिले आहे.२६ वेळा ११० गावांमध्ये वस्त्रांचे वाटपसहकाऱ्यांच्या मदतीने तीन वर्षांत मेळघाटातील तब्बल ११० गावांमध्ये लहानथोरांना वस्त्रांचे वाटप केलेले आहे. पहिल्यांदा २५ आक्टोबर २०१५ला ढाकना, डोिलार, सावऱ्या, मालूर. भांडुप येथे वस्त्रांचे वाटप केल्यानंतर माखला, बिच्छुखेडा, चुनखडी, आवागड, बोराटाखेडा, रेटाखेडा, भूत्रूम, रूईपठार, चिलाटी, हतरू, चेथर, केळदाबोद, चकवाभोळ, भोंडीलावा, रंगुबेली, काटकोह, काटा, कोठा, जांबू, नांदोरी, सोसाखेडा, चौराकुंड, चोपन, भुलोरी, लवादा, मांजरी, बानूर, धोतराढोणा, बिबा, हारू, खारी, हिडला, भवाई, बेला, जांबळी, लोणझरी, मांजरा, बिहाली, निमकुंड, कोहाना, धोतारखेडा, भांदरी, जामूननाला, बोरी, कागपूर, टेटू, अमझरीम खडकाली, आडनदी, पिली, रोरा, भवई, भूलोरी, कोकरू, देढपानी, अंबापाटी, माखला, चुनखडी आदी गावांना वस्त्रांचे वाटप करण्यात आले.