शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘जेम’ नोंदणीअभावी आदिवासी आश्रमशाळांना सीसीटीव्ही ‘ना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 16:33 IST

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ ५५२ शासकीय आश्रमशाळांसाठी सीसीटीव्ही खरेदीच्या ई-निविदेस राज्य शासनाने ‘ब्रेक’ दिला आहे.

अमरावती - आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ ५५२ शासकीय आश्रमशाळांसाठी सीसीटीव्ही खरेदीच्या ई-निविदेस राज्य शासनाने ‘ब्रेक’ दिला आहे. त्याऐवजी केंद्र सरकारच्या गव्हर्न्मेंट मार्केटप्लेस (जेम) पोर्टलमधून ते खरेदी करावे, असे पत्र ‘ट्रायबल’ आयुक्तांनी पाठविले आहे. त्यामुळे यंत्रणांना अगोदर केंद्र सरकारच्या पोर्टलवर खरेदीसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. आर्थिक वर्षात पुन्हा सीसीटीव्ही खरेदीचा निधी अखर्चित राहील, असे संकेत मिळाले आहे.ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत २९ प्रकल्प  अधिनस्थ आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे. त्याअनुषंगाने आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष सहाय्य अनुदान उपलब्ध करून दिले. अमरावतीत दोन कोटी, नागपूर पाच, नाशिक सात, तर ठाणे आठ कोटी असे सीसीटीव्ही खरेदीकरिता अनुदान मिळाले. चारही अपर आयुक्त कार्यालयस्तरावर आश्रमशाळांच्या मागणीनुसार सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीची ई-निविदा राबविली. ई-निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यास मनाई केली. ई-निविदेतून सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी न करता ते केंद्र सरकारच्या ‘गेम’ पोर्टलमधून खरेदी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार  अमरावती अपर आयुक्तांनी पुढाकार घेतला. ई-निविदा प्रक्रिया गुंडाळून आश्रमशाळांसाठी सीसीटीव्ही ‘गेम’ पोर्टलमधून खरेदी करण्याची प्रक्रिया चालविली. मात्र, ‘गेम’मधून खरेदी करताना अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. अमरावती ‘एटीसी’ने त्यादिशेने प्रवास सुरू केला आहे. ‘गेम’मध्ये नोंदणी केल्यानंतरच सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करता येणार असल्याने नोंदणीअभावी ते या आर्थिक वर्षात शक्य नाही. परिणामी अमरावतीत दोन कोटींचा निधी चालू आर्थिक वर्षात अखर्चित असेल, असे संकेत आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले जाईल. ८३ आश्रमशाळांसाठी दोन कोटींतून सीसीटीव्ही कॅमेºयांसह अन्य पूरक साहित्य खरेदी प्रस्तावित आहे. नव्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या गेम पोर्टलवरून खरेदी करू. नोंदणीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.- गिरीश सरोदे,अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती

टॅग्स :cctvसीसीटीव्हीAmravatiअमरावती