१ ते ७ जुलैदरम्यान उपक्रम : जिल्हास्तरीय समितीचे राहणार सनियंत्रणअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात वन महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी १ जुलै रोजी सर्व शाळांच्या आवारात व क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात वृक्ष लावगड करण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यंत्रणेला दिले आहेत.वैश्विक उष्णतेचे वाढणारे प्रमाण व हवामानातील बदल याची तीव्रता व परिणामकारकता कमी करणे, पर्यावरणाचा प्रभावीपणे उपयोग होणार आहे. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने विविध विभाग व जनतेच्या सहभागातून यंदाच्या पावसाळ्यात वन महोत्सव कालावधीमध्ये १ जुलै २०१६ रोजी या एका दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याचे शासनाने ठरविले आहे.शाळांमध्ये भौतिक सुविधांबाबतच्या निकषांमध्ये शाळेच्या आवारात मोठ्या झाडांची लागवड सावलीसाठी करण्याचा अंतर्भाव आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी जैनविविधता, दुर्मिळ अशा वनसंसदेचे रक्षण व त्याचे संवर्धन याबाबत संस्कारक्षम व यात जाणीव आणि आवड निर्माण व्हावी यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीत शाळांमध्ये वृक्षारोपण योजना व अन्य कार्यक्रम राबविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना परिपत्रक जारी केले आहे. या कार्यक्रमांतर्गत पूर्व पावसाळी कामे विहीत कालावधीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आहेत. प्रचलीत निकषाप्रमाणे खड्डे तयार करणे, माती, खत, कीटकनाशके भरून रोपे लागवडीसाठी तयार ठेवण्याच्या सूचना आहेत. वन आणि सामाजिक वनीकरण योजनेंतर्गत मनरेगा, रोहयो, वनमहोत्सव आणि कॅम्पांतर्गत तयार केलेल्या रोप वाटीकेतून पुरेशा संख्येने दर्जेदार, गुणवत्तापूर्ण सुदृढ उंचीची रोपे ३० जूनपर्यंत उपलब्ध करून घ्यावीत व कृषी विभागाच्या रोपवाटिकेमध्ये रोपे उपलब्ध असल्यास तेथून ही प्राप्त करावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. शाळांच्या आवारात रोपांची लागवडस्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवारात तसेच खासगी अनुदानित विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळांच्या आवारात २० रोपांची लागवड करण्यासंबंधी शाळेस उच्च माध्यमिक शाळा संलग्न असल्यास ३० रोपांची किंवा २० पेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात यावी, असे निर्देश आहेत.दर दोन तासांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादरया कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी अंमलबजावणी यंत्रणा व जिल्हा स्तरावरील समन्वयन अधिकारी यांनी प्रत्येक दोन तासांनी जिल्ह्याचा वृक्ष लागवडीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत वृक्ष लागवडीची माहिती छायाचित्रासह संगणक प्रणालीवर तत्काळ करावी. त्यामध्ये लागवड केलेल्या रोपांची संख्या व प्रजाती तसेच वृक्ष लागवडीबाबतची संबंधितांचा सहभाग याचा तपशील अंतर्भूत करण्याचे निर्देश आहेत.रोपे जिवंत राहण्याचे प्रमाण ८० ते ९० टक्के असावेउपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व दृश्य परिणाम दिसून येण्यासाठी रोपांचे संवर्धन, पाणीपुरवठा, रोपांचे जनांवरापासून सरंक्षण होण्यासाठी जैविक किंवा तारांचे किंवा प्लास्टिकचे कुंपण, रोपांची कायमस्वरुपी देखभाल, निगा, संगोपन आदी कामांचे नियोजन करुन आराखडा तयार करावा व त्यानुसार कार्यवाही करावी, वृक्ष लागवड केल्यावर रोपांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्के राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश ओत.या रोपांची करणार लागवडहवामान, पाण्याची उपलब्धता व भौतिक परिस्थिती विचारात घेऊन सावली देणारे शोभिवंत, फळ फळावर देणारे या वृक्ष प्रजातीची प्राधान्याने लागवड करावी यामध्ये आंबा, चिकू, आवळा, कवठ,काजू, फणस, वड, पिंपळ, नीम, पळस, रेन ट्री, गुलमोहर आणि चाफा आदी रोपांची लागवड करावी, असे निर्देश आहेत.
वन महोत्सवात शाळेच्या आवारात होणार वृक्ष लागवड
By admin | Updated: May 17, 2016 00:09 IST