शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

वनविभागाला डावलून समृद्धी महामार्गावर वृक्षलागवडीचा खटाटोप

By गणेश वासनिक | Updated: May 9, 2023 22:50 IST

११ लाख वृक्षलागवडीसाठी नेमली एजन्सी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रताप, झाडांविना मार्ग झाला भकास

अमरावती : युती शासनाच्या काळात राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचा विक्रम करण्यात आला. परिमाणी, चार ते पाच टक्के जमीन वृक्षाच्छादनाखाली आलेली आहे. असे असताना बाळासाहेब ठाकरे समृद्धी राष्ट्रीय महामार्गालगत ११ लाख वृक्षलागवड करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली गेली आहे. वृक्षलागवडीसाठी राज्याचा वनविभाग असताना बाहेरील एजन्सी नियुक्त करण्याचा खटाटोप का?, हा सवाल उपस्थित होत आहे.

समृद्धी महामार्ग पर्यावरणपूरक करण्याचा मानस असला तरी फेज वनच्या ५२० किमीपर्यंत वृक्षलागवड नसल्याने या महामार्गावरून प्रवास करताना डोळ्यासमोर शीतल सावलीचा अभाव दिसून येतो. सात महिने लोटल्यानंतर ही महामार्गावर उंच रोपे लावण्यात आलेली नाही, हे वास्तव आहे. समृद्धी महामार्गाचे नागपूर ते मुंबईपर्यंत ७०१ किमीचा समृद्धी हायवे शिर्डीपर्यंत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते डिसेंबर २०२२ मध्ये प्रवासाकरिता खुला करण्यात आला. सिमेंटच्या या रस्त्यावर उन्हाच्या चटक्यामुळे वाहनाचे टायर फुटून अपघात होत असल्याने दोष टायरांवर दिला जात आहे. हायवेला शीतल करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या अधिग्रहीत जमिनीवर सिमेंटच्या भिंतीचे आवरण तयार करण्यात आले. मात्र, त्यावर वृक्षांचा पत्ता नाही. परिणामी, हा महामार्ग भकास दिसून येत आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी वनविभाग असताना एमएसआरडीसीने वृक्षलागवडीसाठी खासगी एजन्सी नेमली आहे.समृद्धी महामार्गालगत वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत वरिष्ठ स्तरावर धोरण ठरविले आहे. वाशिम, वर्धा, छत्रपती संभाजीनगर या भागात वृक्ष लागवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही ती लवकरच एजन्सीच्या माध्यमातून राबविली जाईल. देखरेख व नियंत्रणासाठी अभियंता नेमला जाईल. - गजानन पळसकर, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, अमरावती.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAmravatiअमरावती