शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

राज्यात वृक्षारोपण ठप्प, ५६८ कोटींचा निधी वापरात न येता वाया जाण्याची शक्यता

By गणेश वासनिक | Updated: June 2, 2025 12:54 IST

Amravati : गतवर्षीपासून वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष; अभिसरण योजनेचे निकष हिरवळीला बाधक

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्रात केवळ १७ टक्के एवढेच वृक्ष आच्छादन असल्याचा अहवाल केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. ही बाब राज्यासाठी अतिशय धोकादायक असून, गतवर्षीपासून वृक्षारोपणाची कामे ठप्प आहेत. जून महिना उजाडला असताना, वृक्ष लागवडीची कामे हाती घेण्यात आली नाहीत. तर, दुसरीकडे सामाजिक वनीकरण आणि वन विभाग प्रादेशिकच्या रोपवाटिकेत 3 कोटी १७लाख ८० हजार रोपे वृक्षलागवडीच्या प्रतीक्षेत आहेत. यात शून्य ते ९, ९ ते १८ आणि १८ महिन्यांवरील रोपांचा समावेश आहे.

अभिसरण योजनेमुळे बट्ट्याबोळ राज्यात वन विभागात गतवर्षीपासून अभिसरण योजना लागू करण्यात आली. मात्र, रोहयोतून कामे आणि जाचक अटींमुळे वन विभागात अभिसरण योजना जणू फेल झाल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पात निधी मंजूर असला, तरी यातून यंदा वृक्षारोपणाची एकही कामे घेण्यात आली नाहीत. तर, मागील वर्षी अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्ह्यातून प्रथम वर्षाची कामे न झाल्याने निधी परत गेला, हे विशेष. राज्य शासनाचे २४०४९२ या योजनेकडे दुर्लक्ष चालविले आहे.

चालू आर्थिक वर्षात ५६८ कोटींचा निधी मंजूरराज्य शासनाने सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम, महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांचे हरितीकरण आणि रस्ते, कालवे व रेल्वे लाइन यांचे दुतर्फा वृक्ष लागवड करणे या वृक्षलावगडीच्या प्रमुख तीन महत्त्वाच्या योजनांसाठी ५६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या योजनेसाठी एकाही वनवृत्तातून प्रस्ताव सादर नसल्याची माहिती आहे.

वनवृत्तनिहाय रोपांची माहिती(प्रादेशिक घटक)अमरावती - ९,७५,१८८चंद्रपूर - १७,५७,५६०छत्रपती संभाजी नगर - ४८,३९,२५६धुळे - १४,०७,४४५गडचिरोली - १७,८०,६९४कोल्हापूर - ५,३३,३९५नागपूर - १०,९२,९५१नाशिक - १६,६५,७३२पुणे - २२,१८,२८२ठाणे - ६,५७,४२३यवतमाळ - १९,३९,५८२एकूण -  १,८८,६७,५०८

सामाजिक वनीकरण घटकअमरावती - २४,७२,९९६नागपूर - २२,४४,५२१नाशिक - ३२,६८,८१४पुणे - १५,६१,६१५छत्रपती संभाजीनगर - २९,०३,१५९ठाणे - ४,६१,९४०एकूण - १,२९,१३,०४५

"अभिसरण योजनतेन वनीकरणाची कामे ही 'एमआरजीएस'मधून करावी लागणार आहे. बजेटमध्ये तरतूद, निधीची मंजुरी अशा अनेक स्थानिक समस्या आहेत. त्यामुळे वृक्ष लागवड, वनीकरणाच्या कामांचे प्रस्ताव कमी येत असावे."- डब्ल्यू. आय. याटबॉन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण पुणे) 

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र