शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

कोरोनाकाळात ३७४ कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

महिला, बाल कल्याण अंगणवाडी केंद्रात सुविधा अमरावती : कोरोनाकाळात अंगणवाड्यांच्या कामकाजावर परिणाम झाला तरी कुपोषित बालकांच्या योजना आणि त्यांच्यावर ...

महिला, बाल कल्याण अंगणवाडी केंद्रात सुविधा

अमरावती : कोरोनाकाळात अंगणवाड्यांच्या कामकाजावर परिणाम झाला तरी कुपोषित बालकांच्या योजना आणि त्यांच्यावर नियमित उपचार या काळातही सुरू होते. गतवर्षी २ हजार १४४ चिमुकल्यांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी २ हजार ८२ बालकांचे श्रेणीवर्धन झाले आहे. यामध्ये मध्यम कुपोषित (मॅम) आणि तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीतील मुलांना ३० दिवसांकरिता दररोज सात ते आठ वेळा पौष्टिक आहार व औषधोपचार देऊन त्यांचे श्रेणीवर्धन झाले आहे.

मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन आदिवासीबहुल तालुक्यांतील एकूण ४७९ अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बालविकास केंद्रे सुरू करून यामध्ये २१४४ मुले दाखल करण्यात आली आहेत. त्यापैकी २०८२ मुलांचे श्रेणीवर्धन झाले आहे तसेच जिल्ह्यात १०३७ सॅम मुलांसाठी एनर्जी डेन्स न्यूट्रीशियस फूड (ईडीएआय) बाल विकास केंद्रे सुरू करण्यात आली. यात ६६३ मुलांचे श्रेणीवर्धन होऊन ती कुपोषण मुक्त झाली आहेत. ग्राम बाल विकास केंद्रात दाखल बालकांचे वजनात वाढ न झाल्यास सीटीसी व एनआयसीमध्ये दाखल करण्यात येत आहे.

गत जानेवारीमध्ये १५ सीटीसी केंद्रांमध्ये ५८ सॅम व ६ मॅम मुलांना दाखल करण्यात आले. यापैकी ५४ मुलांचे श्रेणीवर्धन झाले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागांंतर्गत बाल व मातांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या आधी माता व बालकांना अंगणवाडीत शिजविलेला आहार दिला जात होता. परंतु, कोरोना काळामध्ये बालके आहारापासून वंचित राहू नये, याकरिता कच्चे धान्य घरपोच दिले जात आहे.

मेळघाटात भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू असून, गरोदर स्त्री व स्तनदा मातांना अंगणवाडी सेविकेमार्फत घरपोच डबे दिले जातात. बालकाला आठवड्यातून चार दिवस व महिन्यातून १६ दिवस अंडी दिली जातात. कोरोनाकाळात आहाराचे नियमित वाटप सुरूच आहे. अंगणवाडी सेविकांकडून बालकांचे वजन-उंचीचे मोजमाप नियमित घेतले जात आहे. अंगणवाडी सेविकांकडून बालकांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.

बॉक्स

कोणत्या वर्षात किती कुपोषितांवर उपचार

२०१६- १०७८

२०१७-२२०७

२०१८-२१७४

२०१९-३०८४

२०२०-३१०९

बॉक्स

पाच वर्षांत ७५८० बालके कुपोषणमुक्त

मेळघाटसह जिल्ह्यात २०१६ ते २०२० या पाच वर्षांत ग्राम विकास केंद्रांत उपचाराकरिता एकूण ११६५२ सॅम व मॅम श्रेणीतील कुपोषित मुले दाखल झाली होती. यापैकी ७५८० मुले टप्प्यप्प्प्याने कुपोषणमुक्त झाली आहेत.

कोट

कोरोनाकाळातही तीव्र कुपोषित बालकांवर विभागाचे वैयक्तिक लक्ष आहे. त्यांना ग्राम बालविकास केंद्रे, बाल उपचार केंद्रे तसेच गरज पडल्यास एनआरसीमधून मुलांना उपाचार देण्यात येतात.

- प्रशांत थोरात, उपमुख्यर्कायकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण