शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या वन मंत्रालयात वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘आनंदी आनंद’

By गणेश वासनिक | Updated: April 4, 2025 13:36 IST

व्हाॅट्सॲप व्हॉइस कॉलद्वारे मेसेज : बदलीपात्र आरएफओंना आमदारांच्या शिफारस पत्राची मागणी

गणेश वासनिक / अमरावतीअमरावती : मंत्रालयातील वनविभागाचे बदली व पदस्थापनेशी संबंधित आस्थापनेवर एका बड्या अधिकाऱ्यांनी तर त्यांची झालेली बदली विशेष प्रयत्न करून थांबवली आहे. त्यामुळे वनविभागात आजच्या घडीला सर्वत्र ‘आनंदी आनंद’ असल्याचे चित्र आहे, तर ‘भगवान’कडे सर्व कारभार ‘भगवान भरोसे’ सुरू आहे. प्रत्येक कामासाठी ‘लक्ष्मीदर्शन’ गरजेचे असल्याने बदलीपात्र वनाधिकाऱ्यांची गळचेपी होत असल्याची ओरड आहे.

मागील वर्षी २७० अधिकाऱ्यांची वनपरिक्षेत्र अधिकारी ते सहायक वनसंरक्षक या पदावर पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली होती. यामध्ये तत्कालीन मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालयातील संबंधित अवर सचिव व उपसचिवांनी प्रचंड ‘श्रम’ घेतले. क्षेत्रीयस्तरावरील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून वनाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे हे सोपस्कार सुकरपणे आटोपले. मात्र आता वनपरिक्षेत्र अधिकारी संवर्गातील बदली व पदस्थापनेतही मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार निश्चित झाल्याने याबाबत मंत्रालय पातळीवर कार्यवाही सुरू झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. प्रादेशिक व वन्यजीव शाखेतील कार्यकारी पदासाठी आरएफओंमध्ये स्पर्धा असल्याचे चित्र वनविभागात दिसून येत आहे 

व्हॉट्सॲप व्हॉइस कॉल अन् डीएफओंच्या मंत्रालयीन वाऱ्यावनविभागात सध्याही विभागीय वनाधिकारी संवर्गात अजून पदे रिक्त नसतानाही मंत्रालयातील बडे अधिकारी विचार क्षेत्रातील अधिकाऱ्यांना व्हाॅट्सॲप व्हॉइस कॉल करून भेटीच्या आमंत्रण देत आहेत. त्यामुळे बऱ्याच अधिकाऱ्यांच्या मुंबई वाऱ्या सुरू झालेल्या आहेत. क्षेत्रीय पातळीवरील परिस्थितीचा कुठलाही गंध नसलेले हे मंत्रालयातील अधिकारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा छळ करण्यात मात्र पटाईत आहेत.

"पुढील काळात काही विभागीय वनाधिकारी पदोन्नतीचा यादीत आहेत. त्यामुळेच अशा डीएफओंची माहिती गोळा केली जात आहे. पदे रिक्त झाल्यानंतरच डीएफओंना पदोन्नती दिली जाईल. अन्यथा चारच डीएफओंना पदोन्नती दिली जाणार आहे. आरएफओंच्या बदली, पदोन्नतीचे प्रस्ताव यायचे आहेत."-आनंदा शेंडगे, अपर सचिव, वन मंत्रालय

टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभाग