शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती 'एटीसीं'ची बदली अन्‌ ‘मॅट’मधून स्टे

By गणेश वासनिक | Updated: April 21, 2023 19:19 IST

आदिवासी विकास मंत्र्यांचा दौरा आटोपताच संगीत खुर्चीला खेळ, नव्या अपर आयुक्तांनी पदभार घेताच तासाभरांनी परतल्या 

अमरावती : आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांची अचानक प्रशासकीय कारणास्तव दीड वर्षातच यवतमाळ येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली. मात्र, या बदली आदेशाला वानखेडे यांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले आणि स्टे देखील मिळविला. मात्र, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित दाैऱ्यावर येताच दोन दिवसांनी ‘एटीसीं’ची बदली होते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त (एटीसी) यांचा कारभार १२ जिल्ह्यापर्यंत विस्तारलेला आहे. धारणी, पांढरकवडा, संभाजीनगर, कळमनुरी, किनवट, पुसद आणि अकोला या सात एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयाचा कारभार चालतो. ‘ट्रायबल’मध्ये साधारणत: तीन वर्षांनी प्रमुख धिकाऱ्यांच्या बदल्या होतात. परंतु, एटीसी सुरेश वानखेडे यांची बदली दीड वर्षातच करण्यात आली. त्यांच्या जागी अमरावतीला ‘एटीसी’पदी सातारा येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली. तथापि, वानखेडे यांनी बदली आदेशाला स्थगनादेश मिळविल्याने अमरावती एटीसीपदी ‘जैसे थे’ स्थिती आहे. तर शुक्रवार, २१ एप्रिल रोजी चंचल पाटील यांनी एटीसींचा पदभार स्वीकारला आणि तासाभरातच अमरावतीहून साताराकडे रवाना झाल्याची माहिती आहे. शासन आदेशाला स्टे मिळाल्याने सुरेश वानखेडे हे एटीसीपदी कायम आहेत. मात्र, ‘ट्रायबल’च्या अमरावती अपर आयुक्त पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ अद्याप संपलेला नाही, असे चित्र आहे.वानखेडेंच्या बदली मागे मास्टरमाईंड कोण?अमरावतीचे एटीसी सुरेश वानखेडे यांचा कार्यकाळ संपायला अद्यापही दीड वर्षाचा कालावधी आहे. तरीही १९ एप्रिल २०२३ रोजी बदली का झाली? याचे उत्तर वानखेडे यांना मिळू शकले नाही. त्यामुळे बदली आदेशाविरूद्ध वानखेडे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणकडे (मॅट) धाव घेतली. तर दुसरीकडे नव्या अपर आयुक्त चंचल पाटील यांनी ‘मॅट’ मध्ये कॅव्हेट दाखल केले होते. पण, शुक्रवारी ‘मॅट’ने वानखेडे यांच्या बदली आदेशाला स्टे दिल्यामुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे एटीसीपदाच्या खुर्चीचे वास्तव आहे. वानखेडे यांची तडकाफडकी बदली करण्यामागे मास्टरमाईंट कोण? याविषयी जोरदारचर्चा रंगू लागली आहे.