शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

परदेशात आता ‘ट्रान्सक्रिप्ट’ पाठविणार ई-मेलवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 6:55 PM

कोरोना इफेक्ट : विद्यापीठांचा पुढाकार, परदेशी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना मोठा दिलासा 

अमरावती : परदेशात शिक्षण अथवा पारपत्रासाठी (व्हिसा) अनिवार्य असलेले ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र आता ई-मेलवर मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात अर्ज केल्यानंतर परदेशातील संबंधित संस्था, विद्यापीठात ‘ट्रान्सक्रिप्ट’ ई-मेलवर पाठविले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वेळ आणि आर्थिक बचत होणार आहे.परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र हे अनिवार्य असते. त्याशिवाय परदेशात शिक्षण घेता येत नाही. ‘ट्रान्सस्क्रिप्ट’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी संबंधित विद्यापीठांकडे अर्ज करतात. त्यानंतर हे प्रमाणपत्र परदेशात पोहचण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. हल्ली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विमान सेवा ठप्प असल्याने परदेशात ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र पाठविणे कठीण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोंदविलेली परदेशातील संस्था, विद्यापीठात हे प्रमाणपत्र ई-मेलवर पाठविले जात आहे. विद्यापीठात विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर ‘ट्रान्सक्रिप्ट’ हे दोन ते तीन दिवसांत ई-मेलद्वारे पाठविले जात आहे. हल्ली ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र हे एकूणच विद्यापीठांतून ई-मेलद्वारे पाठविण्यात येत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कॅनडा येथील वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेससाठी विद्यार्थ्यांकडून ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्राची मागणी होत आहे. २१ मार्च ते २४ जून या कोरोना कालावधीत ४५ विद्यार्थ्यांनी  ‘ट्रान्सक्रिप्ट’ची मागणी केली आहे. जुलै महिन्यात ३५ अर्ज विद्यार्थ्यांनी सादर केले आहे.

सीलबंद लिफाफ्यातही दिली जाते ‘ट्रान्सक्रिप्ट’विद्यापीठातून परदेशात ई-मेलद्वारे पाठविली जाणारे ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र सीलबंद लिफाफ्यातही विद्यार्थ्यांच्या पत्त्यावर पाठविले जाते. मात्र, आता ई-मेलद्वारे प्रमाणपत्र पाठविले जात असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी परदेशातील कंपनी, संस्था यांचे ना-हरकत पत्र असल्यास विद्यापीठातून ते थेट त्यांच्याकडेच पाठविले जात होते. याला किमान महिना, दीड महिन्याचा कालावधी लागत होता.  

 

‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र अतिशय गोपनीय राहते. ते सीलबंद पाठविण्याची प्रक्रिया विद्यापीठातून होते. मात्र, हल्ली विमान सेवा बंद असल्याने ते ई-मेलवर पाठविले जात आहे. त्यानंतर ते सीलबंदसुद्धा दिले जात आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठ