शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मुर्तिजापूर स्टेशनवर ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक; ३० व ३१ रोजी १४ रेल्वे गाड्यांना रद्दचा फटका

By गणेश वासनिक | Updated: August 20, 2023 15:43 IST

अप-डाऊनच्या प्रवाशांची होणार दमछाक, अमरावती-मुंबई, अमरावती-पुणे गाडी दोन दिवस रद्द

अमरावती: भुसावळ विभागात ३० ऑगस्ट राेजी सायंकाळी ६ वाजता पासून तर ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुर्तिजापूर स्टेशन यार्ड येथे डाउन लांब पल्ल्याच्या लूप लाईनच्याच्या तरतुदीसाठी रेल्वे पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक परिचालीत करणार आहे. त्यामुळे यादरम्यान मूर्तिजापृूर येथून ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसणार असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या मार्गावर दोन मालगाड्या एकत्र जोडून एकाच वेळी धावत आहेत. पहिल्या मालगाडीसोबत जोडलेली असल्यामुळे दुसऱ्या मालगाडीचा धावण्याचा वेळ आणि धावण्याचा मार्ग वाचतो. दोन मालगाड्यांच्या जवळपास १०० चॅगन एकत्र धावतात. अशा प्रकारे एक मालगाडीच्या एकाच वेळी आणि एकाच मार्गावर दोन मालगाड्या चालवणे शक्य आहे. ज्यामुळे दुसऱ्या ट्रेनच्या वेळेची आणि मार्गाची बचत होते.

भुसावळ आणि नागपूर विभागात अशा लांब पल्ल्याच्या मालगाड्या (दोन मालगाड्यांचे संयोजन) भुसावळ ते नागपूर विभागादरम्यान नियमितपणे धावतात. त्यामुळे मूर्तिजापूर स्थानकावर जवळपास १०० मालगाड्या सामावून घेण्याएवढी लांब लूप लाईन बांधण्याची योजना आहे. त्यामुळे भविष्यात लांब पल्ल्याच्या मालगाड्यांपेक्षा मेल, एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देता येईल. लांब पल्ल्याच्या मालगाड्या यशस्वीरीत्या चालवण्याबरोबरच मेल एक्सप्रेस गाड्यांचा वक्तशीरपणा वाचवण्यात मदत होणारआहे. त्यासाठी मूर्तिजापूर स्थानकावर लांब पल्ल्याच्या वळणासाठी बांधकाम ब्लॉक करण्याचे ३० व ३१ ऑगस्ट रोजी नियोजन केले आहे.या मेल/एक्स्प्रेस १४ गाड्या होणार रद्द

काचीगुडा-नरखेड एक्सप्रेस (१७६४१) ३० ऑगस्ट,नरखेड-काचेगुडा एक्सप्रेस (१७६४२)३१ ऑगस्टलोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह विशेष (०११२७) २९ ऑगस्टबल्हारशाह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०११२८) ३० ऑगस्टभुसावळ- वर्धा एक्सप्रेस (१११२१) ३० ऑगस्टवर्धा-भुसावळ एक्सप्रेस (१११२२) ३१ ऑगस्टपुणे-अमरावती एक्सप्रेस (२२११७) ३० ऑगस्टअमरावती-पुणे एक्सप्रेस (२२११८) ३१ ऑगस्टभुसावळ-बडनेरा पॅसेंजर विशेष (०१३६५) ३१ ऑगस्टबडनेरा- भुसावळ पॅसेंजर विशेष (०१३६६) ३१ ऑगस्टमुंबई-अमरावती एक्सप्रेस (१२१११) ३० ऑगस्टअमरावती-मुंबई एक्सप्रेस (१२११२) ३० ऑगस्टनागपूर-पुणे एक्सप्रेस (१२१३६) ३० ऑगस्टपुणे- नागपूर एक्सप्रेस (१२१३५) ३१ ऑगस्ट