पोलीस आयुक्तांचे निर्देश : इर्विन चौकात मध्यवर्ती कार्यालयअमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील तीन उपविभागाला पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांच्या निर्देशानुसार सेन्ट्रलाईज (मध्यवर्ती) करण्यात आलेले आहे. या निर्णयामुळे वाहतूक शाखेतील मनुष्यबळ कमी होण्याची शक्यता आहे. अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तत्कालीन पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी वाहतूक नियंत्रणासाठी तीन उपविभाग केले होते. राजापेठ व गाडगेनगर उपविभागाचे कामकाज इर्विन चौकातील वाहतूक शाखेमार्फत चालविल्या जात होते. दरम्यान फे्रजरपुरा उपविभागासाठी बाजार समितीजवळील परिसरात एक स्वतंत्र कार्यालय उघडण्यात आले. या तिन्ही उपविभागासाठी तीन पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच तिन्ही उपविभागाला सर्व सुविधा पुरविण्यात आली. प्रत्येक उपविभागात वायरलेस सेट देण्यात आले होते. त्यासाठी तिन कर्मचारी तैनात ठेवण्यात आले. त्यामुळे या तीन्ही उपविभागात मनुष्यबळ विनाकारण गुतंल्या जात असल्याचे लक्षात आले. दरम्यान वाहतूक शाखेत सहायक पोलीस आयुक्त पदाची धुरा पंजाबराव डोंगरदीवे यांनी स्विकारली. पोलीस आयुक्त व सहायक पोलीस आयुक्त यांच्या झालेल्या चर्चेनंतर पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी तीन्ही उपविभाग सेन्ट्रलाईज करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इर्विन चौकातील वाहतूक शाखेचे कार्यालय हे मध्यवर्ती कार्यालय राहणार आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम याना आदेश देण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)फे्रजरपुरा कार्यालय बंद होणारवाहतूक शाखा सेन्ट्रलाईज केल्यामुळे फे्रजरपुरा उपविभाग कार्यालय बंद करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिलेत. त्यानुसार बाजार समिती परिसरातील वाहतूक शाखेचे कार्यालय बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या खासगी इमारतीतील कार्यालयाचे भाडे आता पोलीस विभागाला द्यावे लागणार नाही. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस विभागाकडून उपाययोजना सुरु आहेत. तिन्ही उपविभाग कार्यालयाऐवजी एक मध्यवर्ती कार्यालयातून कामकाज चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे मनुष्यबळ व्यर्थ गुंतुन राहणार नाही. - दत्तात्रय मडंलिक, पोलीस आयुक्त,
वाहतूक शाखेचे तीनही उपविभाग 'सेन्ट्रलाईज'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:08 IST