इंद्रपुरीला लाभली शहिदांची परंपराइंदल चव्हाण अमरावती‘दिलसे निकलेगी न मरकर भी वतन की उल्फत, मेरी मिट्टीसे भी खुशबू ऐ वतन आएगी’ ज्यांना फासावर लटकविताना इंग्रज न्यायालयाला आपण अन्यायाची परिसीमा गाठत असल्याच्या न्यूनगंडाने पछाडले होते, त्या भारतीय क्रांतिकारक त्रिमूर्तींचा आज स्मृतिदिन. हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा होतो. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंनी ज्या सहजपणे देशासाठी मृत्यूला कवटाळले त्याला तोड नाही. पुरातन अंबानगरीचा गौरव असलेल्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अल्पसा का होईना या क्रांतिकारी त्रीमूर्तींपैकी राजगुरूंचा सहवास लाभल्याचे इतिहास सांगतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अमरावतीनगरीने अनेक वीर दिलेत. स्वातंत्र्याच्या चळवळीने त्याकाळी जिल्ह्यातही खोलवर मूळ धरले होते. कित्येकांनी घरदार त्यागून स्वातंत्र्यलढ्यात हिरीरिने भाग घेतला. अनेकांनी प्राण त्यागले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनी जिल्ह्यात सभा घेतल्या.
इंद्रपुरीला लाभली शहिदांची परंपरा
By admin | Updated: March 23, 2015 00:23 IST