शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ना ओटीपी दिला ना स्कॅन केले; तरीही गमावले ५.७४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 15:01 IST

डागा सफायरमधील व्यावसायिकाला गंडविले

अमरावती : मोबाइलवर आलेला ओटीपी सांगितला, क्यूआर कोडस्कॅन केला, अन बॅंक खात्यातील पैसे परस्पर उडाले, अशा फसवणुकीच्या घटना नवीन नाहीत. मात्र, येथील एका व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल ५ लाख ७४ हजार रुपये परस्पर डेबिट झाले. ना त्यांनी कुणाला ओटीपी पाठविला, ना कुठला क्यूआर कोड स्कॅन केला. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी घडलेल्या या ऑनलाइन फसवणूकप्रकरणी सायबर पोलिसांनी दोन महिन्यांनंतर २८ जानेवारी रोजी गुन्ह्याची नोंद केली.

येथील जोशी कॉलनीस्थित डागा सफायरमध्ये राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यावसायिकाची तीन बॅंकांमध्ये खाती आहेत. दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ च्या सुमारास झोपेतून उठल्याबरोबर त्यांना मोबाइलवर बॅंकेकडून आलेले संदेश दिसले. तीनही बॅंक खात्यातून ५ लाख ७४ हजार रुपये अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाल्याचे ते संदेश पाहून ते नखशिखांत हादरले. विशेष म्हणजे त्यांना त्याबाबत कुणाचाही फोनकॉल आला नाही. त्यांनी कुणाला ओटीपी वा अन्य कुठलीही माहिती शेअर केली नाही. तरीदेखील अनोळखी आरोपीने त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. लेखी तक्रार नोंदविली. सायबर पोलिस ठाण्याने पुरेसी खातरजमा केल्यानंतर २८ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास अनोळखी आरोपीविरूध्द फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.

पैसे स्वीकारताना ओटीपी लागत नाही

ओटीपी फक्त पैसे देताना लागतो. पैसे स्वीकार करणाऱ्या माणसाला ओटीपीची गरज पडत नाही. अनेकदा नव्या यूजरला पाठवलेले पैसे स्वीकारण्यासाठी ओटीपी लागतो, असं खोटं सांगूनही ओटीपी उकळला जातो. मात्र, जो यूजर पैसे पाठवणार आहे, फक्त त्याच्याच मोबाइल नंबरवर ओटीपी येतो, हे नेहमी लक्षात ठेवावे.

सायबर करीत आहे सुक्ष्म तपास

पैसे भरताना फक्त अधिकृत ॲप्स किंवा वेबसाइटचाच वापर करावा. वेबसाइट अथवा ॲप अधिकृत नसेल, तर ओटीपी ट्रॅक करून पैशाची चोरी केली जाते. ओटीपीशिवाय यूजरची खासगी माहितीही अशा ॲप्समधून लिक होते. त्यामुळे डागा सफायरमधील त्या व्यावसायिकाची ऑनलाइन फसवणूक होण्यापूर्वी त्यांना काही मॅसेज आले का, त्यांनी कुठल्या लिंकवर क्लिक केले का, या अंगाने तपास केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीAmravatiअमरावती