दोन कंपन्यांकडे कंत्राट : शासन १ कोटी ७६ लाख खर्च करणार अमरावती : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून नवबौध्द प्रवर्गासाठी ११ हजार नळांच्या जोडणी प्रक्रियेला वेग आला असून प्रथमच ५ हजार नळजोडणीचे कंत्राट दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे ८० हजार ग्राहक असून त्यांना दररोज ९५ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाणीचोरी वाढल्याने जीवन प्राधिकरण विभागाला नुकसान सहन करावे लागत आहे. ही हानी टाळण्यासाठी सुवर्ण योजनेच्या माध्यमातून गोरगरीब नवबौध्दांना नळजोडणी देण्यात येत आहे. त्याकरिता शासनास्तरावर खर्च करण्यात येत असून या योजनेत ११ हजार नळांच्या जोडणी करण्यात येणार आहेत. त्यासाठी १ कोटी ७६ लाख रूपयांचा खर्च येणार आहे. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून पहिली निविदा उघडण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर व नांदेड अशा दोन कंपन्यांकडे नळ जोडणीचे कार्य कंत्राटपध्दतीने सोपविण्यात आले आहे. लवकरच नळजोडणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून सद्यस्थितीत जीवन प्राधीकरणजवळ आलेल्या यादीप्रमाणे सर्व्हेक्षण सुरु झाले आहे. सुवर्ण जयंती योजनेतून नवबौध्दांना ११ हजार नळांचीजोडणी देण्यात येणार आहे. त्याकरिता पहिली निविदा उघडण्यात आली असून पहिल्या फेरीत पाच हजार नळ जोडणीची कामे केली जातील. यादीप्रमाणे सर्व्हे सुरु करण्यात आला असून दोन कंपन्याकडे कंत्राट देण्यात आले आहे. -प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा.पाणी बिलावरील व्याजमाफीसाठी ३१ जुलै 'डेडलाईन'मुद्दल भरा आणि व्याज माफ करून घ्या, असे निर्भय योजनेचे स्वरुप असून ही योजना ३१ जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महिन्याला कोट्यवधींचा खर्च करून नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करते. त्यामुळे नागरिकांनी पाणी बिल तत्काळ भरून सहकार्य करावे, असे आवाहन जीवन प्राधिकरणने केले आहे. निर्भय योजनेच्या माध्यमातून पाणी बिलावरील व्याज माफ करण्यात येत असून नागरिकांसाठी ही शेवटची संधी आहे.अवैध नळजोडणी तोडण्यास सुरूवातमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अवैध नळजोडणीविरोधात मोहीम छेडली असून काही दिवसांत शेकडो अवैध नळ तोडले आहेत. त्यांना अधिकृत नळजोडणी देण्यात येणार असून नियोजित कागदपत्रांची मागणी करून नळजोेडणी देण्यात येणार आहे.
सुवर्ण जयंती योजनेतून नळजोडणीला सुरूवात
By admin | Updated: July 28, 2015 00:26 IST