शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आंदण कमी दिलं म्हणून छळ : अर्शियाचा मृत्यू की हुंडाबळी? वरुडमध्ये खळबळजनक घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:44 IST

वरूड तालुक्यातील घटना : पतीसह तिघांना अटक, एक दिवसाची पोलिस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २८ मे रोजी सकाळी ९:३० ते १०:३० या कालावधीत वरूड तालुक्यातील आमनेर येथे ही घटना घडली. लग्नात आंदण कमी दिले म्हणून पतीसह सासरच्या मंडळीने तिचा अनन्वित छळ चालविला होता, अशी तक्रार मृताच्या पित्याने वरूड पोलिसांत नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी २८ मे रोजी सायंकाळी मृताच्या पतीसह दीर व एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. तिघांनाही बुधवारी रात्रीच अटक करण्यात आली. अर्शिया शेख फईम (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

अब्दुल फईम अब्दुल रहीम (३४), अब्दुल नदीम अब्दुल रहीम (३०) व एक महिला (सर्व रा. आमनेर, वरूड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील रहिवासी अकबर खान सदर खान (५५) यांनी याबाबत तक्रार नोंदविली. एफआयआरनुसार, अकबर खान यांची मुलगी अर्शिया हिचे सन २०२२ मध्ये अब्दुल फईम याच्यासोबत लग्न झाले. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यावर लग्नात आंदण कमी दिल्याच्या कारणावरून पती अब्दुल फईम, दीर अब्दुल नदीम व सासू यांनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. या सततच्या छळाला कंटाळून तिने २८ मे रोजी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घटनेनंतर मृत विवाहितेचे वडील अकबर खान यांनी वरूड ठाण्यात तक्रार दाखल केली.

अशी आहे तक्रारलग्नात आंदण कमी दिल्याच्या कारणावरून पतीसह सासू व दिराने छळ केल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप अकबर खान यांनी केला. त्या आधारे वरूड पोलिसांनी पती अब्दुल फईमसह दीर अब्दुल नदीम व सासू अशा तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यांना रात्रीच ताब्यात घेतले.गुरुवारी तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

टॅग्स :dowryहुंडाdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाAmravatiअमरावती