शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पथ्रोटमध्ये मुसळधार; ट्रॅक्टर अर्धे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

नाल्याच्या उगमावर व पथ्रोट परिसरातील शेतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाच वर्षांनंतर ग्रामस्थांना मोठा पूर अनुभवायला मिळाला. शहानूर धरण होण्यापूर्वी या नाल्याला मोठे पूर जात होते. मात्र, सन १९८२ मध्ये शहापूर धरणाची निर्मिती झाल्यामुळे शहानूर धरणाच्या उगमावर पाण्यात तर काही शहानूर कालव्यामध्ये जात असल्याकारणाने नाल्याला कमरेइतकेच पुराचे पाणी येत होते.

ठळक मुद्देथापेरा नाल्याला पूर : बैलजोडी वाहिली, वस्तीत शिरले पावसाचे पाणी, जनजीवन विस्कळीत, प्रशासनातर्फे नुकसानाचे सर्वेक्षण सुरू

अरूण पटोकार।लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : गुरुवारी दुपारी दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने पथ्रोट गावात हाहाकार उडाला. अलीकडच्या १५ ते २० वर्षांत असा पाऊस अनुभवला नसल्याची प्रतिक्रिया जुण्याजाणत्यांनी दिली. सखल भागात ५ ते ७ फूट पाणी होते. गावातील थापेरा नाल्याच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने मोठे नुकसान झाले. या पाण्यात एक बैलजोडी वाहून गेली. ती शुक्रवारी गावालगत मृतावस्थेत आढळली. गावातील एका चौकात दोन ट्रॅक्टर अर्धे बुडाले होते.गुरूवारी दुपारी ४ च्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सलग दोन तास मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले एकत्र झाले. त्यातच थापेरा नाल्याच्या उगमावर मुसळधार पाऊस झाल्यामुळे अचानक आलेल्या नाल्याच्या पुरामध्ये येथील शेतकरी रामदास उपरीकर यांची गोठ्यात बांधलेली बैलजोडी खोडासहित वाहून गेल्यामुळे दोन्ही बैल मरण पावले. खरिपाच्या पावसाळ्यातील भर हंगामात त्यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.नाल्याच्या उगमावर व पथ्रोट परिसरातील शेतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाच वर्षांनंतर ग्रामस्थांना मोठा पूर अनुभवायला मिळाला. शहानूर धरण होण्यापूर्वी या नाल्याला मोठे पूर जात होते. मात्र, सन १९८२ मध्ये शहापूर धरणाची निर्मिती झाल्यामुळे शहानूर धरणाच्या उगमावर पाण्यात तर काही शहानूर कालव्यामध्ये जात असल्याकारणाने नाल्याला कमरेइतकेच पुराचे पाणी येत होते. मात्र, गुरुवारी झालेल्या पावसामुळे पथ्रोट नाला तुडूंब भरून वाहिल्याने पथ्रोट येथील काही वस्तीत पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पथ्रोटमधील माळीपुरा, जयसिंगपुरा, आंबेडकर चौक, गुजरी लाईन, आर्य समाज चौक, ग्रामसचिवालय व सोसायटीच्या आवारात नाल्याच्या पुराचे पाणी शिरले आहे.दुकाने पाण्यातग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने काहींना गावातील मुख्य चौकात हलविता येणारी टिनाची दुकाने देण्यात आली. त्या टपऱ्या अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्या. गावाच्या अनेक भागात ५ ते सहा फूट पाणी होते. गावातील झोपडपट्टी परिसराला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी स्थानिक प्रशासनाच्यावतीने पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली.शहानूर धरणाचा जलसाठा ५१ टक्क्यांवरआठ दिवसांपूर्वी शहानूर नदीच्या उगमावर दमदार पाऊस झाल्याने ४७ टक्के जलसाठा होता. गुरूवारअखेर या धरणातील जलसाठा ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती शाखा अभियंता योगेश मोरे यांनी दिली.जवळापुरातही पाऊसअचलपूर तालुक्यातील जवळापूर गावातील आठ ते दहा घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. गावातील शाळेपर्यंत पावसाचे पाणी साचले होते. शेतशिवारातील नाला फुटल्यामुळे पुराच्या पाण्याने सुनील कडू व त्यांच्या लगतच्या शेतातील पिके खरडून गेली.

टॅग्स :Rainपाऊस