शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

आजपासून चिखलदरा पर्यटन महोत्सव

By admin | Updated: February 5, 2016 00:21 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथील पोलीस परेड मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : रंगारंग कार्यक्रम, जंगल सफारी, गाविलगड भ्रमंती चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथील पोलीस परेड मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. विदर्भाचे उपेक्षित पर्यटनस्थळ म्हणून दुर्लक्षित स्थळाला पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न नगर परिषद पर्यटन विकास महामंडळ व जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने काही वर्षांपासून केला जात आहे. पोलीस परेड मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ५ ते ८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रवीण पोटे, विशेष अतिथी म्हणून नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, खा. आनंदराव अडसूळ, खा. रामदास तडस, आमदार प्रभुदास भिलावेकर, सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, रवी राणा, यशोमती ठाकूर, रमेश बुंदेले, अनिल बोंडे, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, पर्यटन सचिव वल्या नायरसिंह, महसूल विभागाचे सचिव विास खारगे, विभागीय आयुक्त डी.एस. राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित राहतील. १९९२ ला पहिल्यांदा चिखलदरा पर्यटन महोत्सवाची मुहूर्तमेढ तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी रोवली. गाविलगड किल्ल्यावर हा पर्यटन महोत्सव झाला. मात्र त्यानंतर पुन्हा अवकळा आली. २००६ साली तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांनी पर्यटन महोत्सव अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान काही वर्षे पुन्हा लोकप्रतिनिधींची अनास्था झाली. स्व.सुधाकरराव नाईक यांच्यानंतर २३ वर्षांनी चिखलदरा पर्यटन महोत्सवाला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. चिखलदरा पर्यटन महोत्सव ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान असला तरी पर्यटकांच्या खास आग्रहास्तव ८ फेब्रुवारी रोजी हिंदी, मराठी हास्य कविसंमेलन ठेवण्यात आले आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १२ वाजतादरम्यान रांगोळी रेखाटन व पतंगबाजी, दुपारी २ वाजता विविध साहसी उपक्रम पदभ्रमंती घोडा व ऊंट सफारी तर सायंकाळी महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेल्या गाविलगड किल्ल्यावर लाईट अ‍ॅन्ड साऊंड शोचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरासिलिंग, व्हॅलीक्रासिंग रॉकक्लायबिंग, पदभ्रमण, मॅरेथॉन स्पर्धा व साहसी उपक्रम तीन दिवस चालणार आहे. साहसी व विविध कार्यक्रमानंतर ५ ते ८ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजबानी राहील.(तालुका प्रतिनिधी)