शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खातेप्रमुखांनाे, रजेवर जाता? मग पूर्वपरवानगी घ्या; सीईओंनी काढले लेखी आदेश

By जितेंद्र दखने | Updated: May 4, 2024 21:28 IST

यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी लेखी स्वरूपात २५ एप्रिल रोजी आदेश जारी केले आहेत.

अमरावती : जिल्हा परिषदेत विविध विभागांचे प्रमुख असलेल्या विभागप्रमुखांसह १४ पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांनी रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी लेखी स्वरूपात २५ एप्रिल रोजी आदेश जारी केले आहेत.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांचे प्रमुख तसेच पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी हे रजेवर जाताना परस्पर अर्ज पाठवून रजेवर जात असल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढला होता.

विभागप्रमुख तसेच गटविकास अधिकारी हे अत्यंत जबाबदारीचे पद असल्याने कार्यालयातील प्रमुखाच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यास अडचण निर्माण होते. याद्वारे सर्व विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांनी यापुढे रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व लेखी परवानगी घेऊनच रजेवर जावे. अपवादात्मक परिस्थितीत लेखी परवानगी घेणे शक्य नसल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रजेबाबत विनंती करून त्यांच्या मान्यतेनेच रजा घेणे बंधनकारक केले आहे. यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय प्रमुख रजेवर गेल्यास याबाबतची गंभीर नोंद घेण्यात यावी. याविषयी दक्षता घेण्याचे या लेखी आदेशात जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख तसेच १४ पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या लेखी आदेशात बजावले आहे.विभागप्रमुख, गटविकास अधिकारी ही अत्यंत जबाबदारीची पदे आहेत. मात्र बरेचदा विभागप्रमुख, गटविकास अधिकारी हे परस्पर अर्ज पाठवून रजेवर निघून जायचे. यामुळे प्रशासनात महत्त्वाच्या विषयांबाबत निर्णय घेताना अडचणी येत असत. त्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे.- संतोष जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावतीzpजिल्हा परिषद