शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवकाळी, गारपीटने १९ हजार हेक्टर बाधित; ११ हजार हेक्टरमधील गहू, हरभऱ्याला फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 19:21 IST

धामणगाव तालुक्यात ४.६ मिमी पाऊस पडला. यामध्ये पाच घरांचे अंशत: नुकसान झाले.

अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वादळासह झालेला अवकाळी पाऊस व गारपीटचा नऊ तालुक्यांतील १८ हजार ९२० हेक्टरमधील रबीसह फळपिकांना फटका बसला. या आपत्तीमुळे १० हजार ८३६ हेक्टरमधील कपाशीसह गहू व हरभरा तसेच ८ हजार ३४ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. हातातोडांसी आलेला घास अवकाळीने हिरावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

सध्या रबीचा हंगाम सुरू आहे. सवंगवणी केलेल्या, गंजी लावलेल्या तसे उभ्या असलेल्या पिकांचे या गारपीट व वादळाने नुकसान झाले आहे. अमरावती तालुक्यात २.९ मिमी पाऊस पडला. यामध्ये १७० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. भातकुली तालुक्यात वाठोडा शुक्लेश्वर येथे १.१० हेक्टरमधील निंबू, १० हेक्टरमधील गहू व ढंगारखेडा येथे दोन घरांचे टिन उडाल्याने नुकसान झाले.

धामणगाव तालुक्यात ४.६ मिमी पाऊस पडला. यामध्ये पाच घरांचे अंशत: नुकसान झाले. नांदगाव तालुक्यात २.९ मिमी व मोर्शी तालुक्यात १०.२ मिमी पाऊस पडला. या दोन्ही तालुक्यात पिकांचे अंशत: नुकसान झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ९.२ मिमी पाऊस पडला. येथे धनेगावला गोठ्यावर वीज पडल्याने गाय व वासराचा मृत्यू झाला व ४० घरांचे अंशत: नुकसान झाले. धारणी तालुक्यात सिनबंध गावांमध्ये वादळाने काही घरांचे टिनपत्रे उडाली, तर अचलपूर तालुक्यात वादळाने काही घरांचे टिनपत्रे उडाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. २१ मार्चपर्यंत पाऊस, गारपीटची शक्यता

अमरावती : छत्तीसगड आणि सभोवताली ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पूर्व विदर्भ ते तामिळनाडू द्रोणिय स्थिती आहे. त्यामुळे विदर्भात २१ मार्चपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, विजांच्या गडगडाटासह पाऊस व तुरळक ठिकाणी गारपीटची शक्यता वर्तविली आहे. हा पाऊस पश्चिम विदर्भात पडण्याची शक्यता अधिक आहे. हे वातावरण कमी अधिक प्रमाणात २१ तारखेपर्यंत राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.  असे आहे तालुकानिहाय नुकसान (हेक्टर)तालुका              शेतीपिके             फळपिके       एकूणअमरावती          १७०.००              ——           १७०भातकुली             ——                ०१.१०          ०१.१०मोर्शी                   ८१.००              ४५.००          १२६.००दर्यापूर                 ०६.००               ——           ०६.००नांदगाव               ७२२.००             १४.६२         ७३६.६२अंजनगाव           ५२६.२०             ३५.५०         ५६१.७०अचलपूर           ९८.९५               ५०१.०७         ६००.०२चांदूरबाजार       ९२८२.००           ७४३७.००       १६७१९.००एकूण                 १०८८६.१५         ८०३४.२९       १८९२०.४४

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र