शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

अमरावती जिल्ह्यातले वाघोबा मध्यप्रदेशच्या जंगलात शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:28 IST

दहा दिवसांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक वाघ मध्य प्रदेशच्या जंगलात शिरल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील गावांमध्ये अलर्ट

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा दिवसांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक वाघ मध्य प्रदेशच्या जंगलात शिरल्याची माहिती आहे. वनविभागाने महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरील सर्व गावांमध्ये अलर्ट जारी केला आहे.वरोरा जंगलातील वाघाने अमरावती जिल्ह्यात दोन माणसे व पाळीव पशूंची शिकार केली. वनविभागाचा ताफा हातात काठ्या आणि बेशुद्ध करण्याच्या बंदुका, शिकार अडकविण्यासाठी मांस ठेवलेले पिंजरे घेऊन त्याच्या मागावर आहेत. वाघ पुढे-पुढे आणि कर्मचारी त्यांच्या मागे असा हा शिवाशिवीचा खेळ दहा दिवसांपासून सुरू आहे. वनाधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा रात्रंदिवस त्या नरभक्षक वाघाच्या पाऊलखुणांवर चालत असताना, सोमवारी सायंकाळी ४ वाजता धारूड गावानंतरचे लोकेशन मंगळवार सायंकाळपर्यंत वनविभागाला सापडले नव्हते.

गावागावांत दवंडीगावागावांत दवंडी पिटण्यात आली असून, सोमवारी सायंकाळी ४ नंतर वाघाचे लोकेशन वनविभागाजवळसुद्धा नसल्याने शोधमोहीम सुरू झाली. वाघाची माहिती मध्य प्रदेश सीमेवरील गावांमध्ये पसरताच सर्वत्र दहशत पसरली आहे. 'भागो रे भागो शेर आया' म्हणत काहींनी दिवसाच घराचे दार बंद करून आश्रय घेतला आहे.

दररोज २० किमीचा टप्पावरोरा जंगलातील या युवा वाघाने दररोज २० किलोमीटरचा टप्पा पार केल्याचे आतापर्यंतच्या वाटचालीवरून स्पष्ट होत आहे. अमरावतीचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, परतवाडा वनपरिक्षेत्राधिकारी शंकर बारखडे, वडाळीचे कैलास भुंबर, वरूडचे प्रशांत लांबाडे, वनपाल संतोष धापड, मकसूद खान, वनरक्षक मिलिंद गायधने, राजेश खडसे, नावेद काझी, देवानंद वानखडे, विजय तायडे, किशोर धोत्रे आदींनी मध्यप्रदेश सीमेवरील गावांना मंगळवारी भेटी देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.या गावातील नागरिकांना अलर्टमध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील आठवणीत रेंजमध्ये तेथील वनअधिकाºयांनीसुद्धा वाघावर लक्ष केंद्रित करीत नागरिकांना सूचना दिल्या. परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत घाटलाडकी, रेडवा चिचकुंभ मध्यप्रदेशच्या अर्धमानी, हिरादेही, नळामानी, धारुड आदी गावांचा समावेश असून, हिरादेहीच्या घनदाट जंगलात वाघाने आश्रय घेतल्याची माहिती वनाधिकाºयांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर त्याने कुठलीच शिकार मंगळवारी केली नसल्याचे सांगण्यात आले.मध्य प्रदेशच्या पलासपानीत दोन गार्इंवर हल्लानरभक्षी वाघाने मंगळवारी सकाळी मध्यप्रदेशच्या आठनेर तालुक्यातील पलासपाानी गावाच्या जंगलात धुमाकूळ घातला. सकाळी ९ वाजता एकापाठोपाठ दोन गाईंवर त्याने हल्ला चढविला. मात्र, गुराख्याने आरडाओरड केल्याने वाघ तेथून पळाला. परतवाडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडेसोबत वनविभागाच्या पथकाने तेथील पाहणी केली असता, पगमार्क व हमला करण्याची पद्धत पाहता तोच वाघ असल्याचे स्पष्ट झाले. धारुड येथून २० किलोमीटर अंतरावर पलासपाणी आहे. मध्यप्रदेश वनविभागाच्या पथकानेसुद्धा आता त्या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. मंगळवारी सायंकाळी ४ वाजतानंतर वाघाचे लोकेशन वनविभागाला मिळाले.

टॅग्स :Tigerवाघ