शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: अमरावतीच्या ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये बिबट्याचा थरार, रेस्क्यू पथकाच्या वाहनावर झडप

By गणेश वासनिक | Updated: October 25, 2023 22:07 IST

Amravati: गत महिनाभरापासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, शासकीय पाठ्यपुस्तक परिसरात तळ ठोकून असलेला बिबट्या बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काही अंतरावरील ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये शिरल्याने या भागातील नागरिकांनी प्रचंड थरार अनुभवला.

- गणेश वासनिकअमरावती -  गत महिनाभरापासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, शासकीय पाठ्यपुस्तक परिसरात तळ ठोकून असलेलाबिबट्या बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काही अंतरावरील ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये शिरल्याने या भागातील नागरिकांनी प्रचंड थरार अनुभवला. अतिशय दाट झाडी-झुडपे असलेल्या मणिपूर ले-आऊटमध्ये बिबट्याचा शोध घेण्यासाठी निघालेल्या रेस्क्यू पथकाच्या वाहनावरही त्याने झडप मारली. सुदैवाने वन कर्मचारी बचावले. यादरम्यान झालेल्या धावपळीत बिबट्याने दोघांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेतापर्यंत बिबट्या ऑपरेशन सुरूच होते. 

‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये बिबट्या असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच लगतच्या लक्ष्मीनगर, शोभानगर, महेंद्र कॉलनी, प्रवीणनगर, बजरंग टेकडी आदी भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. एकीकडे वन विभागाचा चमू बिबट्याचा शाेध घेत असताना दुसरीकडे नागरिकांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली, हे विशेष. दरम्यान दाट झाडाझुडपात बिबट्या दडून बसल्याने वन कर्मचारी, वन्यजीवप्रेमींनी परिसर पिंजून काढला. बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्यासाठी परिसराला जाळीचे संरक्षण लावण्यात आले. बिबट्या नेमका कोठे दडून बसला याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेरा, बुलडोजरची मदत घेण्यात आली. मात्र, सायंकाळी ६ वाजल्यानंतरही नागरिकांची मोठी गर्दी असल्याने बिबट्याला बंदुकीद्वारे बेशु्द्ध (ट्रँक्विलाइज) करता आले नाही. घटनास्थळी सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, आरएफओ वर्षा हरणे, रेस्क्यू पथकाचे आरएफओ प्रभाकर वानखडे, पशु वैद्यकीय अधिकारी सागर ठोसर आदी उपस्थित होते.

वन विभागासह रेस्क्यू पथकाची चमू घटनास्थळी तळ ठोकून आहे. मणिपूर ले-आऊट परिसरात बुधवारी सकाळी बिबट्या लोकांना आढळून आला. त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.- अमितकुमार मिश्रा, उपवनसंरक्षक, अमरावती.

टॅग्स :Amravatiअमरावतीleopardबिबट्या