शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

‘नकोशी’ला विहिरीत फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 6:00 AM

शेतातील ती विहीर कोरडी असल्याने आत बाळ असल्याचे क्षणात दिसून आले. त्यामुळे शेतमालक अमर अनिल सोनार व शिरजगाव कसबा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बालिकेला विहिरीबाहेर काढले. वैद्यकीय तपासणीअंती ते बाळ स्त्रीलिंगी, तीन ते चार महिन्यांचे व मृत पावल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देकरजगाव येथील घटना : अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्ककरजगाव : अवघ्या चार महिन्यांच्या गोंडस बालिकेला विहिरीत टाकून अज्ञात पालकाने पळ काढल्याची घटना रविवारी स्थानिक रामनगर शिवारात उघडकीस आली. काही वेळातच त्या बालिकेचा मृत्यू झाला. शिरजगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनाम्याअंती अज्ञात पालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.येथील संजय सोनार हे रविवारी पहाटे पाचच्या सुमारास रामनगर मार्गावर फिरायला गेले असता, अमर सोनार यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांना बाळाचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. त्याचवेळी सोनार यांनी गावकरी व सहकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. गावकऱ्यांनी सदर विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना एक बाळ दिसून आले. शेतातील ती विहीर कोरडी असल्याने आत बाळ असल्याचे क्षणात दिसून आले. त्यामुळे शेतमालक अमर अनिल सोनार व शिरजगाव कसबा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बालिकेला विहिरीबाहेर काढले. वैद्यकीय तपासणीअंती ते बाळ स्त्रीलिंगी, तीन ते चार महिन्यांचे व मृत पावल्याचे स्पष्ट करण्यात आले. अमर सोनार यांच्या तक्रारीवरून अज्ञात पालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास ठाणेदार अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे. अबोध बालिकेचा परित्याग करणाऱ्या मातेचा शोध घेण्यात येईल. तूर्तास त्या बालिकेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे ठाणेदारांनी सांगितले.सलग दुसरी घटनायापूर्वी नजीकच्या बोदळ गावातील रमेश सोलव यांच्या घराच्या लोखंडी दाराला एक वर्ष वयाची नकोशी हात बांधलेल्या स्थितीत आढळून आली होती. ती अन्यत्र जाऊ नये, यासाठी तिचा हात बांधून तिच्याजवळ एक चेंडू ठेवण्यात आला होता. रात्रीच्या किर्र अंधारात त्या चिमुकलीस बोदळ गावात दाराला बांधून ठेवत तिच्या पालकांनी पोबारा केला होता. त्या घटनेची शाई वाळते न वाळतेच करजगाव येथे अजून एका नकोशीला विहिरीत फेकण्यात आले. ती बराच वेळ विहिरीत राहिल्याने दगावली.

टॅग्स :Murderखून