खळबळ : परतवाडा विभागाची कारवाई, एक आरोपी पसारअमरावती : परतवाडा शहरात वाहनांमध्ये सागवान तस्करी करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह सोमवारी रात्री पकडण्यात वनकर्मचाऱ्यांना यश आले. दोन घटनेत टाटा सुमो व मारोती व्हॅन सागवान लाकडाची तस्करी करताना तिघांना अटक करण्यात आली. तर यातील एक जण पसार झाला. परतवाडा वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ओम्नी एम.एच.२८/सी-१६६२ ची तपासणी केली असता अक्षय रामदास मावस्कर (वय २०) रा. कोहना ता. चिखलदरा व चालक परतवाडा नजिकच्या कांडली ते कविठा रस्त्यावरुन जात होता. वनकर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सागवान कटसाईज १८ नग, चरपट ८०.३४५ घनमीटर) आढळून आले. यातील अक्षय मावस्कर याला वनकर्मचाऱ्यांनी अटक केली. तर चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेत सागवान चरपट व मारोती व्हॅन जप्त करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध वनकर्मचारी करीत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. पडगव्हाणकर यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक अशोक आठवले, वनरक्षक सुरेश काळे, धनंजय काळे, व्हि.बी. ठाकरे, जीनू भारती, राजेश काळे, सुरेश गुळसुंदरे, संजू चौधरी, कथलकर आदी कर्मचाऱ्यांनी सदर दोन्ही कारवाईत भाग घेतला. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १८२७ चे २६ (१) फ, ४१, ४२, ५२ मुंबई वनअधि. १९४२ चे ८८, ८२, ६६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)सागवान लाकूड जप्तदुसऱ्या एका घटनेत वन कर्मचाऱ्यांनी परतवाडा ते बैतुल रोडवर मुस्लिम कब्रस्तानजवळ २८ मे च्या रात्री ८.३० वाजता गस्तीवर असताना टाटा सुमो एम.एच.२२/७७५० ची तपासणी करीत असल्याचे उघडकीस आल्याने आरोपी जैनउल्ला खान नियाजउल्लाखान व नजीम बेग मुजीम बेग दोन्ही रा. ब्राह्मणवाडा थडी यांना अटक करण्यात आली.सागवान तस्करांमध्ये खळबळपरताडा वनपरिक्षेत्रांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्त रात्र गस्त व गुप्त माहितीद्वारे सागवान तस्करांवर पाळत ठेवीत पकडण्यात यश मिळविल्याने सागवान तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
तीन सागवान तस्करांना अटक
By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST