शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
4
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
5
तीन सरकारी बस एकमेकांवर घडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
6
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
7
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
8
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
9
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
10
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
11
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
12
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
13
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
14
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
15
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
17
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
18
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
19
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
20
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...

अमरावतीतील ‘त्या’ अतिशिकस्त इमारतीतील तीन दुकाने सील; पाचव्या मृताची ओळख पटली

By प्रदीप भाकरे | Updated: October 31, 2022 18:13 IST

Amravati Building Collapse : महापालिकेकडून स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक; गुन्हा दाखल

अमरावती : स्थानिक प्रभात चौकस्थित अतिशिकस्त राजेंद्र लॉजच्या दुमजली इमारतीचे छत कोसळून तळमजल्यावरील दुकानाचा व्यवस्थापक व चार मजुरांचा दबून मृत्यू झाला होता. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. महापालिकेने सोमवारी तेथील तीनही दुकाने सील केली. तथा एका दुकानदाराने आपण आपले दुकान स्वत:हून पाडण्यास होकार दर्शविला. उर्वरित दोन भोगवटदारांच्या होकाराची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. सोमवारी ती तीनही दुकाने बंद होती.

राजेंद्र लॉजचे छत कोसळून तळमजल्यावर राजदीप बॅग हाऊस या दुकानात काम करणारे चार मजूर व व्यवस्थापकाचा मृतदेह चार तासांच्या मदतकार्यानंतर दुपारी ४.३० पर्यंत मलम्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेत मृत पावलेल्या चार जणांची ओळख रविवारीच पटली होती. तर उर्वरित एका मजुराची ओळख सोमवारी पटविण्यात आली. देवानंद हरिश्चंद्र वाटकर (३५, महाजनपुरा) असे त्या मृत मजुराचे नाव आहे.

पाचही जणांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, महापालिकेचे उपअभियंता सुहास चव्हान यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री राजदीप बॅग हाऊसचे हर्षल शहा व एका महिलेविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. दोघांनाही मुंबईहून अमरावतीत बोलावले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, सोमवारी शहर कोतवाली पोलिसांनी मृताच्या काही कुटुंबियांचे बयान नोंदविले गेले. आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सोमवारी सकाळीच घटनास्थळी पाहणी केली. तर आढावा बैठक घेऊन अतिशिकस्त इमारतींचे दोन दिवसांत स्पॉट व्हेरिफिकेशन करण्याचे निर्देश अधिकारी व सहायक आयुक्तांना दिले. ज्या इमारतींना ३० वर्षे वा त्याहून अधिक काळ झाला असेल, अशांना स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक करण्यात आले असून, त्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात देखील गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निवेदन शहर कॉंग्रेस व मनसेने विभागीय आयुक्त तथा महापालिका आयुक्तांना दिले.

वर्षभरापुर्वी दिले होते स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट

राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावरील पाचही दुकानदारांनी स्ट्रक्चरल इंजिनिअर चेतन प्रजापती यांच्या स्वाक्षरीचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट ७ सप्टेंबर २०२१ रोजी महापालिकेला दिले होते. मात्र त्यांनी गतवर्षी कुठलिही डागडुजी केली नाही. त्यामुळे महापालिकेने त्या पाचही दुकानदारांना २० ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा दुकान खाली करून डागडुजीची सुचना केली होती.

निष्काळजीपणा भोवला

२३ जुलै रोजी राजेंद्र लॉजचे पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील बांधकाम पाडल्यानंतरही खालची पाचही दुकाने नियमितपणे सुरू ठेवण्यात आली होती. यंदा प्रचंड पावसाळा झाल्याने ती इमारत अधिकच शिकस्त झाली. दरम्यान, राजदीप बॅग हाऊसचे हर्षल शहा व महिलेने तज्ञ अभियंत्याचे मार्गदर्शन न घेता, दुरूस्तीचे काम रविवारी सुरू केले. परिणामी लोखंडी गर्डर उभे केले जात असताना राजदिप बॅग हाऊसच्या दोन्ही दुकानावरील छत कोसळले. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू व दोघांच्या जखमीवस्थेस हर्षल शहा व एक महिला कारणीभूत ठरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाAmravatiअमरावती