शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रभात चौकातील ‘ती’ तीन दुकाने भूईसपाट; अतिक्रमण निर्मुलन पथकाची कारवाई

By प्रदीप भाकरे | Updated: November 3, 2022 17:27 IST

महापालिकेने 'त्या' तीनही दुकानांवर जेसीबी फिरवून संपूर्ण जागा मोकळी केली

अमरावती : व्यवस्थापकासह चार मजुरांचा नाहक बळी घेणाऱ्या राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावरील तीनही दुकाने गुरूवारी जमीनदोस्त करण्यात आली. राजापेठ झोन व अतिक्रमण निर्मुलन पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. रविवारी दुपारी ती भीषण घटना घडल्यानंतर आयुक्तांनी सोमवारी लगेचच पाहणी करून खालची तीनही दुकाने खाली करून पाडण्याचे आदेश यंत्रणेला दिले होते. बरहुकूम गुरूवारी दुपारी लॉजखालील तीनही दुकानांवर जेसीबी चढविण्यात आला.

राजेंद्र लॉजच्या तळमजल्यावर असलेल्या राजदीप बॅग एम्पोरियममध्ये डागडुजी सुरू असताना अचानक छत कोसळल्याने मलम्याखाली सहा जण दबले गेले. पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. लॉजचा पहिला व दुसरा माळा पाडण्यात आल्यानंतरही खालच्या राजदीप, शाहीन व आसाम टी कंपनी या पाच दुकानांवर त्याचा तसुभरही फरक पडला नव्हता. ती पाचही दुकाने अविरत सुरूच होती. मात्र, रविवारी दुपारी घात झाला.

राजदीप बॅग एम्पोरियममध्ये काम करणारे चार मजूर व व्यवस्थापक काय होते पाहून घेऊ, या प्रवृत्तीचे बळी ठरले. त्यानंतरही खालची तीन दुकाने खाली करून पाडण्यास संबंधितांनी सहजासहजी होकार दिला नाही. शाहीन पेन हाऊसच्या संचालकांनी सोमवारी होकार भरला होता. तर आसाम टी कंपनीच्या दोन्ही दुकानदारांनी केवळ दुकान बंद ठेवण्यास होकार भरला. मात्र, गुरूवारी अखेर महापालिकेने त्या तीनही दुकानांवर जेसीबी फिरवून संपूर्ण जागा मोकळी केली.

यांनी केली कार्यवाही

प्रभातचौकस्थित राजेंद्र लॉज खालील आसाम टी कंपनी, सोसायटी टी, शाहीन स्टेशनर्स ही तीनही दुकाने झोन क्र.२ व अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाडण्यात आली. महापालिका आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या आदेशाने अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, उपअभियंता सुहास चव्हाण, अभियंता अजय विंचूरकर, अतिक्रमण निरीक्षक शाम चावरे, योगेश कोल्हे, प्रसन्नजीत चव्हान, निरज तिवारी, शुभम पांडे, समीर शाह, सुनील यादव, गजानन संगोले, सागर काळे, शेख सलीम, अब्दुल रहीम, शहबाज खान, यश सांगोले यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाAmravatiअमरावती