शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ उत्तीर्ण करण्यासाठी तीन संधी, अन्यथा नोकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 17:31 IST

टीईटी  (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तीन संधींमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुभा शासनाने दिलेली आहे. या तीन संधींची गणना ३० जून २०१६ पासून लगतच्या तीन टीईटीसाठी आहे. जून २०१७ मध्ये पहिली संधी झाली आहे.

अमरावती : टीईटी  (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तीन संधींमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुभा शासनाने दिलेली आहे. या तीन संधींची गणना ३० जून २०१६ पासून लगतच्या तीन टीईटीसाठी आहे. जून २०१७ मध्ये पहिली संधी झाली आहे. आता दोन संधी उरल्या आहेत. तीन संधींमध्ये  टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीच्या वेळी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) धारण करणाºया उमेदवारासच नियुक्त करण्यात यावे, असा शासननिर्णय  १३ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेला आहे. २४ नोव्हेंबर २०१७ च्या परिपत्रकानुसार, किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण असणाºया उमेदवाराची नियुक्ती सरळ सेवेने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर करण्यात आली असल्यास व तो टीईटी उत्तीर्ण नसल्यास प्रथम तीन संधीत टीईटी उत्तीर्ण होणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. या तीन संधींची गणना केव्हापासून करण्यात यावी, याबाबत संभ्रम होता. त्यामुळे शासनाने २४ नोेव्हेंबर २०१७ रोजी परिपत्रक काढले आहे. तीन संधीची गणना ३०  जून २०१६ पासून पुढील लगतच्या तीन ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ अशी असेल. ३० जून २०१६ नंतर रिक्त पदांवर होणारी नवीन नियुक्ती ही टीईटीधारकाचीच राहील, असेही या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे. 

- नवीन नियुक्ती ही टीईटीधारकाचीच राहणार आहे. पात्रता धारण करण्यासाठी तीन संधी दिल्या जाणार आहेत. त्यात संबंधितांना परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.- सी.आर. राठोेड, शिक्षण उपसंचालक, अमरावती

टॅग्स :Teacherशिक्षक