शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यातून १० लाखांचा गांजा जप्त; तीन आरोपी अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: January 9, 2023 17:10 IST

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

बडनेरा (अमरावती) : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरातील पाचबंगला परिसरातून जात असलेल्या तिघांकडून ९.९७ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. तपासादरम्यान, यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखेचे पथक बडनेरा भागात पेट्रोलिंग करीत असताना काही इसम गांजा घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. पाचबंगला परिसरात सापळा रचून त्या तीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे ३३ किलो २५० ग्रॅम ओलसर हिरवा गांजा आढळून आला. नईम शहा वल्द नकीम शहा (४९, गवळीपुरा रतनगंज), हबीब शहा वल्द हुसेन शहा (५०, यास्मिन नगर), व शेख वसीम वल्द शेख अयुब (३२, हाजरा नगर, अमरावती) असे अटक आरोपींची नावे आहेत. तो गांजा शेख इमरान उर्फ गोलू अण्णा शेख कादर (रा. आझाद नगर) याचा असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. आरोपीविरुद्ध एनडीपीएस ॲक्टनुसार बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोलू अन्नाला ताब्यात घेणार

याप्रकरणी शेख इमरान उर्फ गोलू अन्नाला चाैकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राजकिरण येवले, हवालदार अजय मिश्रा, जावेद अहमद, सुधीर गुडदे, गजानन ढेवले, दीपक सुंदरकर, इजाज शहा, चेतन कराडे, योगेश पवार, जगन्नाथ लुटे यांनी ही कारवाई केली. अटक तीन आरोपी तो गांजा नेमका कुठे घेऊन जाणार होते, की कुणाला विक्री करणार होते, या दिशेने देखील तपास करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थAmravatiअमरावती