शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१.६७ लाख उज्ज्वलांना मोफत तीन गॅस सिलिंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 12:12 IST

Amravati : उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थीना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत

लोकमत न्यूज नेटवर्क  अमरावती : जिल्ह्यात केंद्र शासनाचे ३०० रुपयांचे अनुदान मिळणाऱ्या १,६७,०१४ उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थीना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. शिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या नावे गॅस कनेक्शन असल्यास त्यांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती. याबाबत मंगळवारी शासनादेश जारी झालेला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीना वर्षाला तीन मोफत सिलिंडर मिळणार आहेत. यामध्ये गॅस सिलिंडरची बाजारभावानुसार होणारी ८३० रुपयांची रक्कम लाभार्थीजवळून तेल कंपनी घेतील व त्यानंतर केंद्र शासनाचे ३०० रुपये व राज्य शासनाचे ५३० रुपये असे एकूण ८३० रुपये महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. एका महिन्यात एकाच सिलिंडरसाठी शासन अनुदान मिळेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी वा अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठन केली जाणार आहे. या समितीचे सदस्य सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी राहतील. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या नावे गॅस कनेक्शन असल्यास त्यांनाही पहिले गॅस सिलिंडर रक्कम देऊन घ्यावे लागेल. नंतर शासन अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

५.८२ लाख जनरल गॅस कनेक्शनजिल्ह्यात विविध कंपन्यांचे ५,८२,३६० जनरल गॅस कनेक्शन आहेत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या नावे गॅस कनेक्शन असल्यास त्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल. एका कुटुंबातील एकाच लाभार्थीला या योजनेचा लाभ दिला जाईल. केवळ १४.४ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांनाच योजनेचा लाभ मिळेल.

"जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे १,६७,०१४ लाभार्थी आहेत. त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल. ५,८२,३६० जनरल गॅस कनेक्शन आहेत. यामध्ये मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या नावे गॅस कनेक्शन असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे."- निनाद लांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी 

टॅग्स :Amravatiअमरावती