कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूला तीन दिवसांपासून ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 05:00 AM2020-11-04T05:00:00+5:302020-11-04T05:00:19+5:30

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबळीची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. त्यानंतरच्या आठ महिन्यांत तब्बल ३६४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू जिल्ह्यात झाला. ही टक्केवारी २.२० अशी आहे. सुरुवातीच्या काळात हॉटस्पॉट ठरलेल्या भागात एप्रिल महिन्यात संक्रमितांच्या सर्वाधिक ह्यहोमडेथह्ण झाल्या. त्यावेळी जिल्ह्याचा मृत्युदर हा आठ टक्क्यांवर पोहोचला होता. कोरोना आजाराविषयी गैरसमज व अंगावर दुखणे काढणे यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते.

A three-day break from the death of the coronary heart | कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूला तीन दिवसांपासून ब्रेक

कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूला तीन दिवसांपासून ब्रेक

Next
ठळक मुद्देसप्टेंबर ७५६०, ऑक्टोबरमध्ये २७४५ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक महिनाभरापासून कमी झाला असताना, आता पहिल्यांदा मृत्युसंख्येलाही ब्रेक लागला आहे. सलग तीन दिवसांत कोरोनाने एकाही मृत्यूची वार्ता नसल्याने जिल्ह्याला कमालीचा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबळीची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. त्यानंतरच्या आठ महिन्यांत तब्बल ३६४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू जिल्ह्यात झाला. ही टक्केवारी २.२० अशी आहे. सुरुवातीच्या काळात हॉटस्पॉट ठरलेल्या भागात एप्रिल महिन्यात संक्रमितांच्या सर्वाधिक ह्यहोमडेथह्ण झाल्या. त्यावेळी जिल्ह्याचा मृत्युदर हा आठ टक्क्यांवर पोहोचला होता. कोरोना आजाराविषयी गैरसमज व अंगावर दुखणे काढणे यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. मात्र, त्यानंतर आरोग्य विभागाचे सर्वेक्षण व उपाययोजनांतील सातत्याने मृत्युदर नियंत्रणात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले.
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक विस्फोट हा सप्टेंबर महिन्यात झाला. या एका महिन्यात ७५६९ रुग्णांची नोंद झाली व १५२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात प्रोटोकॉलनुसार नमुने घेण्यास सुरुवात झाल्यानंतर चाचण्याही कमी झाल्यात आणि मृत्युसंख्याही कमी झाली. मात्र, रोज कोरोनाग्रस्तांचे मृत्यू होत आहेत. आता ३० ऑक्टोबरपासून मृत्यूला ब्रेक लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
दरम्म्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार मंगळवारी तळवेल येथील ५७ वर्षीय रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाले.

सप्टेंबर ७५६०, ऑक्टोबरमध्ये २७४५ रुग्ण
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सर्वाधिक ७५६० रुग्ण सप्टेंबर महिन्यात निष्पन्न झालेत, या महिन्यात दैनंदिन रुग्ण सरासरी २५५ अशी होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात २७४५ रुग्णांची नोंद झाली. या महिन्यात रोजची सरासरी ८८.५४ अशी राहिलेली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेटदेखील उच्चांकी ९४.२० टक्क्यांवर पोहोचला आहे. २ नोव्हेंबरपर्यंत १५,४१४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. डबलिंगचा रेट हा २३४ दिवसांवर गेला आहे.

Web Title: A three-day break from the death of the coronary heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.