शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

साफसफाईवर महिन्याला तीन कोटी खर्च; मग या घाणीला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 12:17 IST

Amravati : ना नाल्या निघे, न नाल्यातील गाळ, रस्त्याशेजारी गार्बेज कलेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सुमारे दहा लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधित्व करणारी महापालिका शहर स्वच्छतेवर महिन्याकाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च करते. शहरातून दैनंदिन निघणारा कचरा व हॉटेल वेस्टदेखील सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन टाकणे बंधनकारक आहे. त्यासाठी महापालिका आस्थापनेवर सुमारे ६५० च्या आसपास सफाई कामगारांसह कंत्राटदारांचे देखील कामगार आहेत. तरीदेखील शहरातील अनेक रस्ते गार्बेज कलेक्शन सेंटर बनले आहेत. दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेसाठी झोननिहाय पाच कंत्राटदार नेमले गेले आहेत. त्यांच्या वतीने शहरात घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जाते. 

कशासाठी किती खर्चकचरा संकलन : झोननिहाय पाच कंत्राटदारांवर महिन्याकाठी एकूण दोन ते २.२५ कोटी रुपये खर्च केले जातात.कचरा प्रक्रिया: सुकळी व अकोली रोड येथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यावर देखील खर्च होतो.कचरा वाहतूक : शहरातून दैनंदिन संकलित होणारा कचरा सुकळी कंपोस्ट डेपोत नेला जातो.

साफसफाईवर पालिकेचा महिन्याला तीन कोटींचा खर्च महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहर स्वच्छतेवर दर महिन्याला सुमारे तीन ते सव्वातीन कोटी रुपये खर्च होतो.

रस्त्यांवरही घाणशहरातील अनेक रस्त्यांवर, रस्त्यांशेजारी कचऱ्याचे ढीग आढळून येतात. अंतर्गत रस्त्याची देखील तीच स्थिती आहे. खुल्या प्लॉटमध्ये देखील कचरा टाकला जातो.

पाचही प्रभागात मोहीम सुरूपाच झोननिहाय कंत्राटदारांच्या माध्यमातून शहराची स्वच्छता केली जाते. घंटागाडीद्वारे दैनंदिन कचरा संकलन करणे बंधनकारक आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यात लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे. - डॉ. अजय जाधव. स्वच्छता विभाग प्रमख

कचरा दररोज उचलला जातो का?घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन केला जातो. तो ट्रक व कंटेनरच्या माध्यमातून सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन टाकला जातो. मात्र शहरातील अनेक भागात घंटागाड्या दररोज येत नसल्याची ओरड आहे. कुठे एक दिवसाआड तर दोन, तीन दिवसांनी घंटागाड्या येत असल्याची ओरड आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती