शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

सलग चार तास मोजले साडेतीन कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:01 IST

सकाळी ७.३० च्या सुमारास एका मेकॅनिकला बोलावून एमएच २० डीव्ही ५७७४ या चारचाकी वाहनाची मधली सीट खोलण्यात आली. सीटखालील संपूर्ण लगदा काढला. त्यासाठी मेकॅनिकला एक तास लागला. सकाळी ८ च्या सुमारास त्या वाहनातील मोठी रक्कम दोन मोठ्या खोक्यांमध्ये रचण्यात आली. ती मालखान्यात ठेवण्यात आली, तर दुसऱ्या वाहनातून केवळ आठ हजारांच्या आसपास रक्कम होती.

ठळक मुद्देनऊ तासांची मॅरेथॉन कारवाई : वेगवेगळा घटनाक्रम उघड, आयकर विभागाच्या तपासणीनंतर होणार उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे पहाटे ४ ते ७ दरम्यान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवत होती. मिळालेली माहितीदेखील अगदी पक्की होती.  त्या भरवशावर पहाटे ६ पासून ठाकरे दलबलासह फरशी स्टॉप रस्त्यावर पोहोचले. सापळा रचण्यापासून या जंबो कारवाईला सुरुवात झाली. त्यानंतर सलग नऊ तास पोलीस याच प्रकरणात गुंतून राहिले. एकाच चारचाकी वाहनातून मोठी रक्कम हस्तगत झाली. ती थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ३.५० कोटी. पोलिसांनी फक्त बंडल मोजून एकूण रकमेची गणना केली. तीही मोजायला पोलिसांना चार तासांहून अधिकचा कालावधी लागला.  सकाळी ७.३० च्या सुमारास एका मेकॅनिकला बोलावून एमएच २० डीव्ही ५७७४ या चारचाकी वाहनाची मधली सीट खोलण्यात आली. सीटखालील संपूर्ण लगदा काढला. त्यासाठी मेकॅनिकला एक तास लागला. सकाळी ८ च्या सुमारास त्या वाहनातील मोठी रक्कम दोन मोठ्या खोक्यांमध्ये रचण्यात आली. ती मालखान्यात ठेवण्यात आली, तर दुसऱ्या वाहनातून केवळ आठ हजारांच्या आसपास रक्कम होती. सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण डुंबरे यांच्या उपस्थितीत त्यानंतर पंचनामा व्हिडीओ शूटिंग घेण्यात आली. सुमारे डझनभर अधिकारी कर्मचारी यात सहभागी होते. मशीनने रक्कम मोजण्यास सात-आठ तास लागले असते, अशी प्रतिक्रिया याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. ती रक्कम हवाल्याचीच असेल, असे पोलीस वर्तुळातूनदेखील बोलल्या गेले. 

तो म्हणाला, १५ लाख रुपयेज्या वाहनातून मोठी रक्कम मिळाली, त्या वाहनचालकाला विचारले असता, ती रक्कम केवळ १५ लाख रुपये असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तेवढीच रक्कम वाहनात आहे, असे आम्हाला सांगण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

रात्रीच फ्लॅटवर मुक्कामीकाही प्रत्यक्षदर्शींनुसार, दोन चारचाकी वाहनांमधून नागपूरहून आलेले चौघे मंगळवारी पहाटे २.३० च्या सुमारास फरशी स्टॉपवरील त्या फ्लॅटवर पोहोचले. काही रक्कम तेथूनही गाडीत भरली. पुढील प्रवासाला निघाले असताना पोलिसांनी त्यांना पकडले. मात्र, या घटनाक्रमाला पोलिसांनी दुजोरा दिला नाही. 

बंडलनिहाय मोजदादसकाळी ९.३० वाजतापासून राजापेठच्या डझनभर पोलीस कर्मचाऱ्यांनी जप्त  रकमेची बंडलनिहाय मोजदाद केली. त्यानंतर हाती आलेला आकडा डोळे विस्फारणारा होता. 

फ्लॅटची झाडाझडतीसकाळी ८.४५ च्या सुमारास राजापेठचा डीबी स्कॉड फरशी स्टॉप परिसरातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पोहोचला. तेथून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

दोन वाहनांमधून ३.५० कोटी रुपये जप्त करण्यात आले. वाहनाच्या सीटखाली ती रक्कम दडवून ठेवण्यात आली होती. सहा जणांना ताब्यात घेतले. ती रक्कम हवालाची की आणखी कशाची, हे आयकर अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर स्पष्ट होईल.- आरती सिंह, पोलीस आयुक्त

 

टॅग्स :Policeपोलिस